Join us

"लग्न कधी करणार?", रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचे फोटो पाहून नेटकरी सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:40 PM

1 / 12
रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आहेत.
2 / 12
'सैराट'मधून आर्ची-परश्याची भूमिका साकारून ते प्रसिद्धीझोतात आले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराटची क्रेझ आजही कायम आहे.
3 / 12
८ वर्षांनंतरही प्रेक्षक रिंकू आणि आकाशची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'सैराट'नंतर त्यांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक होते.
4 / 12
'सैराट'नंतर रिंकू आणि आकाश 'झुंड'मध्ये झळकले होते. पण, त्यांनी या सिनेमात एकत्र काम केलं नव्हतं.
5 / 12
नुकतंच रिंकू आणि आकाशने आमिर खानची लेक आयरा खानच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. पापाराझींना त्यांनी फोटोसाठी एकत्र पोझही दिल्या होत्या.
6 / 12
ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता रिंकूने आकाशबरोबरचे काही फोटोही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7 / 12
रिंकू आणि आकाशला पुन्हा एकत्र पाहून चाहते खूश झाले.
8 / 12
पण, त्यांच्या या फोटोंमुळे नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे. त्यांच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
9 / 12
एकाने कमेंट करत 'तारीख काय ठरली मग लग्नाची? कधी येऊ मी?' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने 'सैराट २ शूटिंग चालू झालं',अशी कमेंट केली आहे.
10 / 12
'साधं लग्न करू नका...पळून लव्ह मॅरेज करा', असंही एकाने म्हटलं आहे. 'तुम्ही दोघे लग्न करा जसं की रितेश देशमुख जिनिलीया देशमुख', अशी कमेंटही केली आहे.
11 / 12
'नं. १ जोडी...लग्न करून टाका', अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने 'तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता', असंही म्हटलं आहे.
12 / 12
रिंकु आणि आकाशचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टॅग्स :रिंकू राजगुरूआकाश ठोसरमराठी अभिनेता