IN PICS: रितेशने जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? तिने आजही जपून ठेवलेलं... By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 8:00 AM1 / 10रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची लव्हस्टोरी फारच भारी आहे.2 / 10नुकताच दोघांचा ‘वेड’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रितेश व जिनिलियाच्या तर चाहते पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत.3 / 10तर आता रितेश भाऊ अन् वहिनीसाहेबांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलुयात. तुम्हाला माहित आहेच की, ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमात रितेश व जिनिलिया पहिल्यांदा एकत्र झळकले होते. 4 / 10‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा तुफान गाजला होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीही लोकांना प्रचंड आवडली होती. दोघांच्या या सिनेमाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 / 10यानिमित्त रितेश व जिनिलिा यांनी नुकतीच मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत रितेशने आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलंच शिवाय जिनिलियाला दिलेल्या पहिल्या गिफ्टबद्दलही सांगितलं.6 / 10 तू जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं? असा प्रश्न यावेळी रितेशला विचारण्यात आलं. या प्रश्नाला रितेशने दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं.7 / 10रितेशने सांगितलं की, मी जनिलियाला दिलेलं सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे गुलाबाचं फुल होतं आणि महत्वाचं म्हणजे जिनिलियाने आजही ते फुल जपून ठेवलं आहे. तिने हे फुल एका पुस्तकात ठेवलं आहे. 8 / 10सध्या रितेश आणि जिनिलिया आपल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जिनिलियाने बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर कमबॅक केलं आहे.9 / 10 ‘वेड’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकजी आहेत. साऊथच्या ‘मंजिली’ या सिनेमाचा रिमेक असला तरी या चित्रपटातील रितेश व जिनिलियाची केमिस्ट्री अफलातुन आहे.10 / 10 रितेशने दिग्दर्शित केलेला ‘वेड’ हा पहिला सिनेमा आहे. त्याच्या दिग्दर्शनाचंही भरभरून कौतुक होतंय. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादामुळे ‘वेड’ सिनेमा दमदार कमाई करत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications