राजमौलींवर ज्युनिअर एनटीआर नाराज? ‘आरआरआर’च्या सेटवरून शॉकिंग न्यूज By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 5:50 PM1 / 10‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण आता या सिनेमाच्या सेटवरून एक शॉकिंग बातमी येतेय.2 / 10होय, ‘आरआरआर’ या सिनेमात रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर लीड रोलमध्ये आहेत. पण आता ज्युनिअर एनटीआर व राजमौली यांच्या काहीतरी बिनसल्याची चर्चा कानावर येतेय.3 / 10मीडियातील चर्चेनुसार, राजमौली व ज्युनिअर एनटीआर यांच्यात सिनेमाच्या शूटींगवरून मतभेद निर्माण झाले आहे. ‘आरआरआर’चे लांबलेले शूटींग शेड्यूल यावरून ज्युनिअर एनटीआर नाराज असल्याचे कळतेय.4 / 10रिपोर्टनुसार, ज्युनिअर एनटीआर हा सिनेमा हातावेगळा करून दुसºया प्रोजेक्टमध्ये काम करू इच्छितो. पण ‘आरआरआर’ संपण्याचे नाव घेत नाहीये. याचे शूटींग दिवसागणिक लांबत चालले आहे. याचमुळे ज्युनिअर एनटीआर नाराज आहे.5 / 10को-स्टार राम चरणने ‘आरआरआर’मधून वेळ काढून आपल्या ‘आचार्य’ या सिनेमाचे शूटींग पूर्ण केले. पण ज्युनिअर एनटीआरला ते जमले नाही. त्याच्या हातात दोन नवे प्रोजेक्ट आहेत आणि ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्याची इच्छा आहे.6 / 10तुम्हाला ठाऊक आहेच की, राजमौलींना कोरोना झाल्यामुळे सर्वप्रथम ‘आरआरआर’चे शूटींग लांबले. यानंतर आलिया भट व अजय देवगण यांनी बºयाच उशीरा सेटवर ज्वाईन केले. यामुळेही शूटींग शेड्यूल आणखी पुढे गेले.7 / 10अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या दोन स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगण या दोघांच्या गुरुची भूमिका साकारताना दिसणार आहे.8 / 10 राजमौली यांनी हा सिनेमा बनवण्यात कोणतीही तडजोड केली नाही. अगदी एका एका सीनवर पाण्यासाखा पैसा खर्च केला. केवळ दोन सीनवर 40 कोटी खर्च करणारा ‘आरआरआर’ हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कदाचित पहिला चित्रपट आहे. 9 / 10 तामिळ, तेलगू, हिंदी व मल्याळमसह एकूण 10 भाषांत ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ‘बाहुबली’ सीरिजनंतर ‘आरआरआर’ हा राजमौलींचा पहिला चित्रपट आहे. 10 / 10 बाहुबली व बाहुबली 2 या चित्रपटांनी छप्परफाड कमाई केली होती. आता 'आरआरआर' हा बिग बजेट सिनेमा किती कमाई करतो ते बघूच. आणखी वाचा Subscribe to Notifications