नवरा सुपरस्टार असूनही ज्युनिअर NTR ची पत्नी राहते प्रचंड साधी; फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 1:57 PM1 / 10दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) याचा'आरआरआर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे.2 / 10आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८०० ते ९०० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असल्याचं पाहायला मिळत आहे.3 / 10 दाक्षिणात्य कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही त्याची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.4 / 10ज्युनिअर एनटीआरच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे आज आपण त्याच्या पर्सनल लाइफविषयी आणि खासकरुन त्याच्या पत्नीविषयी जाणून घेऊयात.5 / 10ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीचं नाव लक्ष्मी प्रनथी असं असून या दोघांच्या वयात सुमारे १० वर्षांचं अंतर असल्याचं सांगण्यात येतं.6 / 10लक्ष्मी ही प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास राव यांची मुलगी आहे. तसंच ती तेलुगू न्यूज चॅनल 'स्टुडिओ एन' ची मालक आहे.7 / 10ज्युनिअर एनटीआर आणि लक्ष्मी यांच्या लग्नसोहळ्याला जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त पाहुणे मंडळी उपस्थित असल्याचं सांगण्यात येतं.8 / 10लक्ष्मी सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसून ती रिअल लाइफमध्येही अतिशय साधेपणाने राहते. 9 / 10ज्युनिअर एनटीआरने सोशल मीडियावर तिच्या पत्नीचे काही फोटो शेअर केले आहेत.10 / 10या दोघांना अभय राम आणि भार्गव राम ही दोन मुलेदेखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications