Rubina Dilaik anfd Abhinav Shukla Reveal Twin Daughters Edhaa & Jeeva's Faces on Navratri Pics Viral
रुबिना दिलैकनं दाखवला जुळ्या मुलींचा चेहरा, एधा आणि जीवावर नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव! By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:33 PM1 / 11 छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस' विजेती रुबिना दिलैक ही कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 2 / 11 रुबिनाने २७ नोव्हेंबर रोजी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. तेव्हापासून या मुलींची झलक पाहण्यासाठी, त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक 3 / 11पण, रुबिनाने तिच्या मुलींची झलक दाखवली नव्हती. त्यांचा चेहरा लपवून ठेवला होता. 4 / 11अखेर रुबिनाने नवरात्रीत चाहत्यांना पहिल्यांदाच जुळ्या मुलींचा चेहरा दाखवला आहे. 5 / 11सोशल मीडियावर तिने आपल्या लाडक्या मुलींचे फोटो शेअर केले आहेत.6 / 11तिच्या दोन्ही मुली दिसायला खूपच गोड आहेत. 7 / 11रुबीनाच्या मुलींना पाहताच चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. 8 / 11रुबिनाच्या मुलींची नावे ही एधा आणि जीवा अशी आहेत. 9 / 11एधा आणि जीवा ही दोन्ही नावं देवींच्या नावावरुन ठेवण्यात आली आहे. एधा म्हणजे समृद्धी आणि जीवा म्हणजे जीवनरेखा. 10 / 11 प्रेग्नंसीच्या काळात रुबिना दिलैक सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होती. रुबिना प्रेग्नंसीमध्ये अनेक टीप्स शेअर करत होती. अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीच्या कालावधीचा खूप आनंद घेतला. एवढंच काय तर डिलिव्हरीनंतर अवघ्या ५५ दिवसांत तिचे वजन ११ किलोने कमी केले. रुबिना डिलिव्हरीनंतर कामावर परतायचे होते, यासाठी अभिनेत्रीने स्वतःला तीन महिन्यांचा वेळ दिला. तीन महिन्यांतच तिन वजन कमी केलं आणि अभिनेत्री पुन्हा कामावर परतली.11 / 11रुबिनाने २०१८मध्ये अभिनव शुक्लाशी लग्नगाठ बांधत संसार थाटला. लग्नानंतर पाच वर्षांनी ते आईबाबा झाले. 'बिग बॉस १४’मध्ये ते दोघं सहभागी झाले होते. या पर्वाची रुबिना विजेतीही ठरली होती. ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’, ‘इश्क मे मरजावा’, ‘नमक इश्क का’, ‘सास बिना ससुराल’, ‘तू आशिकी’ अशा अनेक मालिकांमध्ये रुबिनाने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications