रूबीना दिलैकने डिलिव्हरीच्या ३ महिन्यानंतर घटवलं ११ किलो वजन, सांगितलं सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 16:59 IST
1 / 9टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने अवघ्या ५५ दिवसांत तिचे वजन ११ किलोने कमी केले आहे. अभिनेत्रीने तिचे वजन कमी करण्यामागील प्रेरणादायी सीक्रेट सांगितले आहे. रुबीना दिलैकने तिच्या प्रेग्नेंसीनंतरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीचे प्रसूतीनंतरचे वजन कमी होताना दिसत आहे.2 / 9रुबीना दिलैकने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी पती अभिनव शुक्लासोबत जुळ्या मुली झाल्याची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली. या जोडप्याने आपल्या मुलींसोबतचे फोटो शेअर करून याचा खुलासा केला होता.3 / 9छोटी बहू फेम अभिनेत्री रुबिना तिच्या गरोदरपणातही तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती. अभिनेत्रीने तिच्या प्रेग्नेंसीच्या कालावधीचा खूप आनंद घेतला.4 / 9रुबिनाने नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने तिचे रहस्य सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की, तिने ५५ दिवसांत ११ किलो वजन कमी केले आहे.5 / 9गरोदरपणामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी रुबिनाला प्रेरणेची गरज होती. त्या प्रेरणादायी रहस्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या व्लॉगमध्ये खुलासा केला आहे.6 / 9अभिनेत्रीने सांगितले की तिने तिचा एक जुना ड्रेस तिची प्रेरणा म्हणून वापरला. रुबिनाने तीन महिन्यांत हा ड्रेस परिधान करून स्वतःसाठी योग्य बनवायचे असे लक्ष्य ठेवले.7 / 9रुबिना दिलैकने सांगितले की, तिला गरोदरपणानंतर कामावर परतायचे होते, यासाठी अभिनेत्रीने स्वतःला तीन महिन्यांचा वेळ दिला आणि तीन महिन्यांतच अभिनेत्री पुन्हा कामावर परतली.8 / 9रुबिनाने तीन महिन्यांत आपले लक्ष्य पूर्ण केले आहे. एखाद्या व्यक्तीसाठी तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे, असे या अभिनेत्रीचे मत आहे.9 / 9रुबीनाचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.