सचिन खेडेकर यांची पत्नी कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहे कार्यरत, मोठा लेक असतो परदेशात By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 7:00 AM1 / 12मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि गुणी अभिनेता म्हणजे सचिन खेडेकर. (Sachin Khedekar)2 / 12सचिन खेडेकर यांचा जन्म १४ मे १९६५ मध्ये झाला . सचिन खेडेकर यांनी अनेक भाषांमध्ये काम केले आहे. त्यांची वेगळी अशी छाप मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीवर पडली आहे. 3 / 12डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपटही त्यांनी साकारून सर्वांचीच मन जिंकली होती. सचिन खेडेकर हे उत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक उत्तम व्यक्ती देखील आहेत.सचिन खेडेकर यांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले. 4 / 12अर्जुन पंडित, दाग द फायर, अस्तित्व, बिच्छू, जंग, हम प्यार तुम्ही से कर बैठे, हत्यार, दिल है तुम्हारा, मुझसे दोस्ती करोगे, पिताह, देश देवी तेरे नाम, प्राण जाये पर शान ना जाये, सत्य बोल, रक्त, विरुद्ध, कुछ मिठा हो जाये, पोलीस, शो बीज, आपका सुरूर, गुरु, समर २००७, वूड स्टॉक वीला यासारख्या असंख्य चित्रपटात त्यांनी काम केलेले आहे.5 / 12मराठी, हिंदी, तामिळ चित्रपटातील त्यांच्या भूमिका या लोकप्रिय ठरल्या आहेत. सिंघम चित्रपटात साकारलेला गोट्या हा प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. सचिन खेडेकर यांच्याकडे आगामी काळात आणखी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येते. 6 / 12सचिन खेडेकर यांनी १९९३ साली जल्पा यांच्यासोबत लग्न केले आहे.7 / 12जल्पा या कलाविश्वापासून लांब असून त्या अनेक वेळा सचिन खेडेकर यांना मदत देखील करत असतात. 8 / 12जल्पा या एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. जलपा या एका मोठ्या फिजिओथेरपिस्ट असून त्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे.9 / 12सचिन खेडेकर व जल्पा यांना दोन मुलं असून त्या मुलांची नावे सोहम आणि अर्चित अशी आहेत.10 / 12सचिन खेडेकर यांचा मोठा मुलगा सोहम हा कॅलिफोर्निया येथे राहतो. कॅलिफोर्निया येथे त्याने एका मोठ्या विद्यापीठातून संगणक शास्त्रामध्ये शिक्षण घेतलं आहे. सोहम हा सध्या मेटा या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. तर सचिन खेडेकर यांचा लहान मुलगा अर्चित हा सध्या शिक्षण घेत आहे. 11 / 12सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अस्तित्व, इम्तिहान आणि द बॉस द फर्गटन हिरो यासारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. काकस्पर्श, कोकणस्थ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.12 / 12मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते म्हणून सचिन खेडेकर यांची एक वेगळी ओळख आहे. चिमणी पाखरं, फक्त लढ म्हणा, शिक्षणाच्या आईचा घो, आजचा दिवस माझा यासारख्या चित्रपटातूनही त्यांनी अफलातून अशा भूमिका केल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications