Zaheer-Sagarika love story: फारच फिल्मी आहे झहीर खान, सागरिका घाटगेची लव्हस्टोरी, मोठ्या मुश्कीलीने झालं होतं लग्न By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2022 1:28 PM1 / 9बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेटचं (Cricket) पूर्वीपासूनच एक खास नातं आहे. काही क्रिकेटर्सनं अभिनेत्रींशी लगीनगाठही बांधली. मराठमोठी अभिनेत्री सागरिका घाटगेनं (Sagrika Ghatge) शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) भूमिका साकारलेल्या चक दे इंडिया या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. 2 / 9सागरिकाचा जन्म ८ जानेवारी १९८६ ला कोल्हापुरातील राजघराण्यात झाला होता. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक राष्ट्रीय पातळीवरून एक हॉकी प्लेयरदेखील आहे. सागरिकानंही आपला जोडीदार म्हणून भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज जाहीर खानची (Zaheer Khan) निवड केली. जाणून घेऊ कशी होती त्यांनी लव्हस्टोरी.3 / 9जहीर आणि सागरिका यांची लव्हस्टोरी फिल्मी आहे. त्यांची ओळख एका कॉमन मित्रामुळे झाल्याचं सांगण्यात येतं. यानंतर दोघंही एकमेकांना डेट करू लागले. 4 / 9दोघांना पहिल्यांना २०१६ मध्ये युवराज सिंग आणि हेजल यांच्या लग्नात एकत्र पाहण्यात आलं. त्यानंतर दोघंही रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याच्या अफवा उडू लागल्या होत्या.5 / 9सागरिकानं जहीर खानशी लग्न केलं असलं तरी त्यांचं लग्न इतक्या सहजासहजी झालं नाही. जाहीर खाननं आपल्या कुटुंबीयांकडे सागरिका आणि त्याच्या लग्नाबद्दल परवानगी मागितली होती.6 / 9सागरिकाची त्यांना ओळख पटावी यासाठी त्यानं आपल्या घरी चक दे इंडिया या चित्रपटाची सीडी मागवली होती. त्यानंतर त्यानं तो चित्रपट आपल्या कुटुंबीयांना दाखला. त्याच्या घरचे यानंतर इम्प्रेस झाले आणि लग्नासाठीही त्यांनी होकार दिला. 7 / 9सागरिकाचे वडील विजय घाटगे यांचंदेखील मनोरंजनश्रृष्टीची अगदी जवळचं नातं होतं. ते देखील बॉलिवूडमधील परिचित अभिनेते आहेत. सागरिकाच्या कुटुंबीयांच्या जाहीरची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तो चांगला मराठी बोलू शकतो. 8 / 9सागरिका आणि जाहीर यांनी एप्रिल २०१७ मध्ये साखरपुडा केला आणि नोव्हेंबर २०१७ मध्ये ते विवाहबंधनात अडकले. दोघेही आपली पर्सनल लाईफ खुप एन्जॉय करतात आणि अनेकदा सोशल मीडियावर ते आपले फोटोही शेअर करताना दिसतात. सागरिका अखेरिस २०१७ मध्ये नसीरुद्दीन शाह यांचा चित्रपट इरादामध्ये झळकली होती. 9 / 9सागरिकाला एकदा मुलाखती दरम्यान जाहीर खानच्या भूमिकेत कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी तिनं रणबीर कपूरला पाहायला आवडेल असं म्हटलं होतं. (सर्व फोटो - सगारिका घाटगे, इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications