Sai Tamhankar : सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? यावर अभिनेत्रीनं दिलं हैराण करणारं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 7:53 PM1 / 9मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कायम सई ताम्हणकरकडे (sai tamhankar) पाहिले जाते. मराठीसह बॉलिवूडमध्येही सईने आपली छाप सोडली आहे. त्यामुळे आज सई कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2 / 9'मीमी', 'दुनियादारी', 'हंट', 'तु ही रे', 'नो एन्ट्री' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेली सई लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.3 / 9 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. 4 / 9नुकतेच तिने मुंबई तकच्या चावडीवर हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तू सिंगल आहेस की मिंगल असे विचारण्यात आले. त्यावेळी तिने दिलेले उत्तर ऐकून चाहते हैराण झाले आहेत.5 / 9उत्तर देताना सईने म्हटले की, ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’. मात्र, सईच्या या उत्तरामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.6 / 9काही महिन्यांपूर्वी सई ताम्हणकर हिने सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. सिने निर्माता अनिश जोग याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करून सईने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती. 7 / 9दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेत करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील पाहायला मिळतात.8 / 9 मात्र, आता सई ताम्हणकरने ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ म्हटल्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडला आहे. मात्र, तिने यावर सविस्तर बोलणं टाळलं आहे. 9 / 9श्रीदेवी प्रसन्न चित्रपटानंतर भक्षक या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications