Join us  

सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णीसह मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री घेतात सर्वात जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 3:05 PM

1 / 10
Sai Tamhankar : सई ताम्हणकर हिने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. अर्थात तिला यामध्ये अजूनतरी प्रमुख भूमिका मिळाली नसली तरी तिने सहाय्यक भूमिका म्हणून बऱ्याचशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने गजनी, व्हिला आणि मिमी या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2 / 10
याशिवाय मराठीमध्ये तिने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. दुनियादारी, टाइम प्लीज, क्लासमेट अशा चित्रपटांमध्येही तिने उत्तम भूमिका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सई तीच्या प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास २०-२५ लाख एवढे मानधन घेते.
3 / 10
Sonali Kulkarni: मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दोन सोनाली कुलकर्णी आहेत. त्यापैकी मोठी सोनाली कुलकर्णी आजही चित्रपटांमध्ये आपली चतुरस्त्र भूमिका गाजवताना दिसते. सोनालीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'दिल चाहता है'मधली तिची भूमिका विशेष गाजली होती.
4 / 10
याशिवाय सिंघम, आणि टॅक्सी नं. ९२११ मध्येही ती दिसून आली होती. इतकेच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये दोघी​​, देऊळ, गुलाबजाम, पुणे५२, डॉ.प्रकाश बाबा आमटे, रिंगा रिंगा, सखी या चित्रपटांमध्येही तिने उत्तम भूमिका केल्या आहेत. सोनाली प्रत्येक चित्रपटासाठी १५-१९ लाख एवढे मानधन घेते.
5 / 10
Sonalee Kulkarni: मोठ्या सोनाली कुलकर्णीनंतर मानधनामध्ये नंबर लागतो तो छोट्या सोनालीचा... मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून ओळख जाणारी सोनाली आताची टॉपची अभिनेत्री आहे. 'नटरंग' या सिनेमातून तिला खूप लोकप्रियता मिळाली आहे.
6 / 10
सोनालीने बकुळा नामदेव घोटाळे, अजिंठा, मितवा, झपाटलेला 2, पांडू, झिम्मा अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या आहेत. सोनाली आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी १०-१२ लाखाचे मानधन घेते.
7 / 10
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सरदेखील आहे. तिने आपल्या करिअरच्या सुरुवातीला काही कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही केलं आहे.
8 / 10
अमृताने गोलमाल, मुंबई सालसा, साडे माडे तीन, हॅटट्रीक, नटरंग अशा चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. यात राझी आणि मलंग चित्रपटात काम केले आहे. अमृता एका चित्रपटासाठी १० लाखाच्या घरात मानधन घेते.
9 / 10
Priya Bapat : प्रिया बापट आपल्या सौंदर्यामुळे आणि तिच्या स्टाईलमुळे सातत्याने चर्चेत असते. तिने हिंदीतील मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती सिटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमधील तिची भूमिका वाखाणण्याजोगी आहे.
10 / 10
प्रिया बापट वजनदार, टाईमपास 2, आंधळी कोशिंबीर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श अशा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रिया आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ८-१० लाखाचे मानधन घेते.
टॅग्स :सई ताम्हणकरसोनाली कुलकर्णीसोनाली कुलकर्णीप्रिया बापटअमृता खानविलकर