'हिला उर्फी जावेद चावली का...?', सई ताम्हणकर कपड्यांमुळे झाली ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:32 AM1 / 8मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते.2 / 8अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.3 / 8सई ताम्हणकर हिने नुकतीच एका अवॉर्ड फंक्शनला हजेरी लावली. त्यासाठी तिने निवडलेल्या आउटफिटमुळे ती चर्चेत आली आहे.4 / 8सई ताम्हणकरने इंस्टाग्रामवर या आउटफिटमधील फोटोशूट शेअर केले आहे. सईने नेहमीपेक्षा हटके ड्रेस परिधान केला आहे.5 / 8सई ताम्हणकरच्या या फोटोंना काही चाहत्यांची पसंती मिळत आहे. तर काहींनी सई ताम्हणकरचा हा ड्रेस पाहून तिला ट्रोल केले आहे.6 / 8एका युजरने म्हटले की, गरीबांची सनी लिओनी, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, सईला उर्फी जावेदसारखं वेड लागलं वाटतं. तर आणखी एकानं लिहिले की, हिला उर्फी जावेद चावली का?7 / 8तर आणखी एका युजरने सईच्या फोटोवर कमेंट केली की, या अवॉर्डला पूर्ण कपडे घालून गेलेलं चालत नाही का??8 / 8सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच मधुर भांडारकर दिग्दर्शित इंडिया लॉकडाउनमध्ये झळकणार आहे. या सिनेमात ती फुलमतीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications