Join us

Saie Tamhankar : सई ताम्हणकरने घटस्फोटानंतरही एक्स पतीची ही गोष्ट ठेवलीय जपून, म्हणते - "त्या आठवणी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:24 IST

1 / 10
अभिनेत्री सई ताम्हणकरला सध्या कोणत्याही परिचयाची गरज नाही. ती सिनेइंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2 / 10
सई ताम्हणकरने आतापर्यंत हिंदी आणि मराठीमध्ये विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
3 / 10
सई बऱ्याचदा प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. ती घटस्फोटीत आहे, हे अनेकांना माहित आहे.
4 / 10
नुकतेच एका मुलाखतीत सई ताम्हणकरने तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. यावेळी तिने एक्स पतीसोबत आताही संपर्कात असल्याचं सांगितलं.
5 / 10
सई ताम्हणकरने २०१३ साली व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीसोबत लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.
6 / 10
२०१५ साली सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी कायदेशीररित्या वेगळे झाले. घटस्फोटानंतर त्या दोघांनी चक्क पार्टी केली.
7 / 10
कोर्टातील अनुभव सांगताना सई म्हणाली की, कोर्टात नाव पुकारलं जातं तेव्हा बाजारात आल्यासारखे वाटते होते. त्यावेळी सई ताम्हणकर गोसावी अशी हाक मारली तेव्हा एक विचित्र भावना मनात आली. त्या क्षणी फार काही बोलायची इच्छा नव्हती. पण कोर्टातून बाहेर आल्यानंतर आम्हाला थोड चिल करायचे होते. त्यामुळे आम्ही ड्रिंक्ससाठी बाहेर गेलो.
8 / 10
तिथे आम्ही थोडे रडलो, प्रेमाने बोललो आणि आयुष्यभरासाठी एकमेकांना सल्ले दिले, असे सईने सांगितले. त्यानंतर जवळच्या मित्रांना फोन करुन बोलवून घेतले आणि पार्टी केली, असेही ती म्हणाली.
9 / 10
सई ताम्हणकर तिचा एक्स पती अमेय गोसावीच्या संपर्कात आहे. ती सांगते की, मी अजूनही त्याचे टॅटू अंगावर ठेवले आहेत. कारण त्या आठवणी पुसून टाकण्यात काहीच अर्थ नाही.
10 / 10
सई ताम्हणकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची डब्बाकार्टेल या वेबसीरिजमध्ये झळकली. त्यानंतर आता ती इमरान हाश्मीसोबत ग्राउंड झिरो या सिनेमात दिसणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिलला रिलीज होणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकर