बहीण जितकी ग्लॅमरस तितकाच साधा आहे भाऊ; तुम्ही पाहिलंय का रिंकू राजगुरुच्या सख्खा भावाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 11:22 IST
1 / 10सैराट या सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर रिंकूने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.2 / 10सैराट, कागर, मेकअप अशा कितीतरी सिनेमांमध्ये रिंकू झळकली आहे. इतकंच नाही तर तिने काही गाजलेल्या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे.3 / 10सोशल मीडियावर आज रिंकूचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. त्यामुळे रिंकू सातत्याने या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.4 / 10प्रोफेशनल लाइफसोबत रिंकू तिच्या वैयक्तिक जीवनातीलही काही किस्से, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असते.5 / 10काल सगळीकडे मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरं करण्यात आलं. यात रिंकूने तिच्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलं.6 / 10सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रिंकूने इन्स्टाग्रामवर तिच्या भावासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोच्या निमित्ताने पहिल्यांदाच चाहत्यांनी रिंकूच्या भावाला पाहिलं आहे.7 / 10रिंकू बऱ्याचदा सोशल मीडियावर तिच्या आईसोबतचे फोटो शेअर करते. मात्र, यावेळी तिने तिच्या भावासोबतचे फोटो शेअर केले आहेत.8 / 10रिंकूला सख्खा भाऊ असून सिद्धार्थ असं त्याचं नाव आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावरही फारसा सक्रीय नाही.9 / 10एकीकडे रिंकू अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे. तर, दुसरीकडे सिद्धार्थ क्रीडा क्षेत्रात करिअर करायचा प्रयत्न करतोय.10 / 10सिद्धार्थ प्रचंड साधा असून त्याला फुटबॉल खेळायची प्रचंड आवड आहे.