'सैराट'फेम आनी सध्या काय करते? आर्चीच्या मैत्रिणीत आता झालाय कमालीचा बदल By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 5:00 PM1 / 10आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारा चित्रपट म्हणजे 'सैराट' (sairat) . नागराज मंजुळे (nagraj manjule) दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट २९ एप्रिल २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सबंध महाराष्ट्राला त्याने वेड लावलं.2 / 10समाजातील धगधगतं जातीयवादाचं वास्तव मांडणाऱ्या या चित्रपटाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. आजही या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.3 / 10 सैराटमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे आर्ची, परशा, लंगड्या, सल्या हे कलाकार आज आपल्याला कलाविश्वात सहज पाहायला मिळतात. कोणी मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर कोणी चित्रपटांच्या.4 / 10आर्ची, परशा, लंगड्या यांच्याप्रमाणेच या चित्रपटातील एक पात्र चर्चेत आलं ते म्हणजे आनीचं. या चित्रपटात आर्चीची बेस्टफ्रेंड म्हणजे आनी.5 / 10अभिनेत्री अनुजा मुळे (Anuja Mulay) हिने आनी ही भूमिका साकारली होती.6 / 10सैराट आला आणि लोकप्रियता मिळवून गेला. मात्र, या चित्रपटानंतर आनी म्हणजे अनुजा कलाविश्वातून अचानकपणे गायब झाली. त्यामुळेच ही अभिनेत्री सध्या काय करते ते जाणून घेऊयात.7 / 10सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अनुजाने ‘Ask Me Now’ या सेगमेंट अंतर्गत तिच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. यात ती सध्या काय करते हे सांगितलं.8 / 10अनुजाचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरीदेखील तिने करिअरमध्ये भरारी घेतली आहे. अनुजा आज वकील असल्याचं पाहायला मिळतं. ‘सध्या तू काय करतेस?’ असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला. त्यावर अनुजाने वकिलांच्या कपड्यातील एक फोटो शेअर केला. आणि, ‘हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यांसाठी उत्तर – वकिली’ असं उत्तर दिलं.9 / 10‘आनी’ साकारणाऱ्या अनुजा मुळेने या दरम्यान चाहत्यांना अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. ‘तुझं शिक्षण किती झालंय?’ यावर प्रश्नावर अनुजाने वकिलीत ‘मास्टर्स’ पदवी मिळवल्याचं सांगितलं.10 / 10पुण्यात शिकत असताना अनुजाने एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. यातील ‘चिट्ठी’ या एकांकिकेतील अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळालं. याचवेळी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची निवड ‘आनी’च्या भूमिकेसाठी केल्याचं सांगण्यात येतं. (फोटो सौजन्य: अनुजा मुळे फेसबुक पेज) आणखी वाचा Subscribe to Notifications