Salman Khan: सलमानला सर्पदंश नेमका कसा झाला? वडील सलीम खान यांनी सविस्तर सांगितलं... By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 8:47 PM1 / 8बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला सर्पदंश झाल्याची घटना काल रात्री घडली. पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसवर हा प्रकार घडला. सलमानला तातडीनं कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्या आलं होतं. 2 / 8अखेर सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी याबाबत सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. तसंच सलमानच्या आरोग्याचीही माहिती त्यांनी दिली. 3 / 8साप बिनविषारी असल्यानं प्राथमिक उपचारानंतर सलमानला घरी सोडण्यात आलं. पण सलमानला सर्पदंश झाल्याचा प्रकार नेमका घडला कसा? फार्महाऊसवर नेमकं काय घडलं होतं आणि सलमान काय करत होता? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले होते. 4 / 8सलमान आपल्या बेडरुममध्ये आराम करत होता. त्यानंतर अचानक त्याचा हात दुखू लागला. तिथं एक साप होता की जो खुली जागा पाहून सलमानच्या बेडरुममध्ये शिरला होता. सर्पदंश झाल्याचं लक्षात आल्यानंतर सलमानला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. 5 / 8तीन तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली तो होता. त्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तो आता फार्महाऊसवर परतला आहे आणि पूर्णपणे ठीक आहे. आनंदी आहे, असं सलीम खान यांनी सांगितलं. 6 / 8सलीम खान यांनी यावेळी संपूर्ण प्रसंगावर विनोदी शैलीतही प्रतिक्रिया देत घडलेल्या घटनेला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याची भावना व्यक्त केली. 'आम्हाला सापाबाबत कोणतीही तक्रार नाही. सलमान एकदम ठीक आहे. आम्ही देखील त्या बिचाऱ्या सापाला जाऊ दिलं. फार्महाऊसच्या आजूबाजूला झाडीझुडपं आहेत आणि अनेक किटकांचा वावर तिथं आहे. विशेषत: साप, विंचू आणि सरपटणाऱ्या किटकांचा सर्वाधिक समावेश आहे. असे छोट्या घटना होतच असतात. पण लोक इतकं महत्त्व का देतात हे मला खरंच कळत नाही', असं सलीम खान म्हणाले. 7 / 8सलमान खानच्या वाढदिवसाची जोरदार तयारी सुरू असल्याचीही माहिती सलीम खान यांनी यावेळी दिली. सलमानचा उद्या म्हणजे २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे आणि त्याचंच सेलिब्रेशन करण्यासाठी संपूर्ण कुटुंब फार्महाऊसवर आहे. 8 / 8'आमचं संपूर्ण कुटुंब इथं फार्महाऊसवर आहे. आम्ही सर्वजण सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करत आहोत. सलमान आता ठीक आहे आणि आराम करत आहे', असं सलीम खान म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications