रमजान ईदला चोख बंदोबस्तात सलमानकडून चाहत्यांना शुभेच्छा; भाईजानसोबत दिसणाऱ्या छोट्या मुलांची चर्चा
By देवेंद्र जाधव | Updated: March 31, 2025 18:53 IST
1 / 7सलमान खान हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सलमान खानचा ईदनिमित्त 'सिकंदर' सिनेमा रिलीज झालाय2 / 7रमजान ईदच्या दिवशी सलमानने गॅलेक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीत येऊन सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सलमानसोबत असलेल्या लहान मुलीने सर्वांचं लक्ष वेधलंय.3 / 7सलमान ईदच्या दिवशी छोट्या मुलीचा हात धरुन तिला गॅलेक्सीच्या गॅलरीत घेऊन आला. सलमान पांढऱ्या पठाणी कुर्त्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.4 / 7सलमानसोबत फक्त छोटी मुलगीच नाही तर एक छोटा मुलगाही दिसत होता. हे दोघंही सलमानचे भाचा-भाची असून त्यांचं नाव आहे आहिल आणि आयत शर्मा.5 / 7सलमान यावेळी ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटायला आला. तेव्हा त्याच्या या दोन भाच्यांना घेऊन आला. सलमानच्या या क्यूट भाच्यांनी सर्वांचं मन जिंकलं. 6 / 7बुलेटप्रूफ काच आणि चोख बंदोबस्तामध्ये सलमानने भाच्यांसोबत ईद साजरी केली. सलमानची एक झलक बघण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी झुंबड उडाली होती.7 / 7सलमानची बहीण अर्पिता खानची दोन मुलं आज सलमानसोबत दिसली. सलमान खानचा ईदनिमित्त रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतो.