सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे 'ते' Unseen फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 12:19 IST
1 / 12बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चाहता वर्ग मोठा आहे. लाखो लोकांना सलमानचं वेड आहे. पहिल्या सिनेमापासून आजतागायत तो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहे. 2 / 12सलमान त्याच्या पर्सनल लाईफमुळे कायम चर्चेत राहिला. 3 / 12 सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे प्रेमप्रकरण जगजाहीर आहे. एकेकाळी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण या प्रेमाला वादाची मोठी किनार आहे. 4 / 12इतका मोठा काळ उलटला असूनही दोघांचं नात आजही चर्चेत असतं. आता दोघांचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. 5 / 12सध्या व्हायरल होत असलेले हे फोटो खूप जुने आहेत. त्यांच्या डेटिंगच्या वेळचे आहेत. ज्यामध्ये सलमान ऐश्वर्या एकत्र दिसून येत आहेत. 6 / 12एका फोटोमध्ये सलमान ऐश्वर्या रायच्या गालावर कीस करताना दिसत आहे. 7 / 12दुसऱ्या फोटोत सलमान ऐश्वर्यालाशी प्रेमाने बोलताना दिसून येत आहे.8 / 12 सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांंनी एकेकाळी एकमेकावर जीव ओतला पण, आता दोघेही वेगळे आहेत. ऐश्वर्या तिच्या आयुष्यात आनंदी आहे. तर सलमानही पुढे गेला आहे. पण सलमान अजूनही अविवाहितच आहे. 9 / 12सलमान आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटादरम्यान सुरू झाली होती. चित्रपटादरम्यानच ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते.10 / 12मात्र 'हम तुम्हारे हैं सनम' (2002) या सिनेमाच्या रिलीजनंतर दोघांचे ब्रेकअप झाले होते. या सिनेमात ऐश्वर्या सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती.11 / 12दोघांच्या ब्रेकअपचे खरे कारण काय होते? हे तर फार कमी जणांना ठाऊक आहे. 12 / 12मात्र कथितरित्या ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप लावला होता. 2007 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. आराध्या नावाची एक गोड मुलगी ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आहे.