मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी? By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 12:02 PM1 / 10साउथचे लोकप्रिय कपल नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि सामंथा रूथ प्रभु (Samantha Prabhu) यांनी अखेर घटस्फोट घेत असल्याचं जाहिर केलंय.2 / 10काल शनिवारी सामंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचं जाहीर केलंय. 3 / 10या घटस्फोटानंतर सामंथाने नागा चैतन्यकडून घेतलेल्या पोटगीच्या रकमेची चर्चा रंगलीये. नागा चैतन्यकडून सामंथाने 50 कोटी रूपयांची पोटगी घेतल्याची चर्चा आहे.4 / 10काही वृत्तात नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून सामंथाला तब्बल 200 कोटी रुपयांची पोटगी ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं आहे.5 / 10आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. होय,सामंथाने म्हणे पोटगी घ्यायला नकार दिला आहे. मला नागा चैतन्य वा त्याच्या कुटुंबीयांकडून एक रूपयाही नको, असं तिनं म्हटल्याचं कळतंय.6 / 10सामंथा साऊथची मोठी अभिनेत्री आहे. साऊथमध्ये तिच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे पोटगीच्या रकमेची तिला गरज नाहीये, असं म्हटलं जातंय.7 / 10 काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. गोव्यात थाटामाटात हे लग्न पार पडलं होतं.8 / 10जेवढी लग्नाची चर्चा झाली, तेवढीच त्यांच्या हनीमूनचीही चर्चा झाली होती. दोघेही तब्बल 40 दिवस हनीमूनला गेले होते.9 / 1040 दिवस जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत त्यांनी हनीमून एन्जॉय केलं होतं.10 / 10चार वर्ष दोघांचाही सुखात संसार सुरू होता. पण गेल्या वर्षभरात दोघांमधील मतभेद वाढले होते. याचीच परिणीती अखेर घटस्फोटात झाली. आणखी वाचा Subscribe to Notifications