Join us

'मला शिव्या देण्याची, माझा तिरस्कार करण्याची..',समंथानं नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 1:15 PM

1 / 9
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही साऊथची लोकप्रिय जोडी होती. दोघं प्रेमात पडले आणि यानंतर दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं होतं. (Photo instagram)
2 / 9
मात्र लग्नाला उणीपुरी चार वर्षे होत नाही तोच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. दोघांच्या घटस्फोटाला वर्षभराहून अधिक काळ झाला आहे. या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती.(Photo instagram)
3 / 9
अगदी हा घटस्फोट का झाला इथपासून घटस्फोटानंतरच्या पोटगीपर्यंतच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. अद्यापही ही चर्चा थांबलेली नाही. अलिकडेच सामंथाने मिस मालिनीला एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने तिच्या लग्न, घटस्फोट आणि करिअरबद्दल खुलेपणाने सांगितले.(Photo Instagram)
4 / 9
यादरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, नागा चैतन्यसोबत वेगळे झाल्याचा तिला अजिबात पश्चाताप होत नाही, कारण तिने तिच्या लग्नात 100% दिले. मी माझं लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. (Photo Instagram)
5 / 9
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिने या लग्नात आपले सर्वोत्तम दिले. नागा चैतन्यसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना समंथा म्हणाली, मी माझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी का लपवू?, मी काही चुकीचं तर करत नाहीये,मग मी उगाच अपराध्यासारखं का राहू. (Photo Instagram)
6 / 9
''मी माझ्या वैवाहिक जीवनात माझे १०० टक्के दिले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत त्याची शिक्षा मी उगाच का भोगू?'(Photo Instagram)
7 / 9
''लोक मला ट्रोल करण्याची, मला शिव्या देण्याची, माझा तिरस्कार करण्याची मी वाट पाहू का? मात्र यासगळ्यातून मी स्वत:ला सावरुन हळुहळू कामाला लागले आहे.'' (Photo Instagram)
8 / 9
समंथा पुढे म्हणाली, 'ज्यावेळी मला या गाण्याची ऑफर मिळाली त्यावेळी आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. आम्ही घटस्फोट घेतोय हे ज्यावेळी सगळ्यांना सांगितलं. त्यावेळी, मी हे गाणं करु नये असं माझ्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना वाटत होतं. अनेकांनी मला त्यावेळी सल्लेही दिले होते'. (Photo Instagram)
9 / 9
सामंथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न केवळ चार वर्षे टिकू शकलं. दोघांनी 2 ऑक्टोबर 2021 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, विभक्त झाल्याची घोषणा केली होती. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर 2017 साली सामंथा व नागा चैतन्य यांचं लग्न झालं होतं. (Photo Instagram)
टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodघटस्फोट