Join us

"भाजीवाल्यानेही मला विचारलं..." प्रेग्नंसीनंतर तिने केला डिप्रेशनचा सामना, वजनामुळे अभिनेत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:54 PM

1 / 8
अभिनेत्री म्हणलं की नेहमी नीटनेटकं आणि चांगलं दिसणंच अपेक्षित असतं. अनेकदा अभिनेत्रींना त्यांच्या दिसण्यावरुन ट्रोल केलं जातं. वजन वाढलं असेल तर कित्येकदा अभिनेत्रींना अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. याचा परिणान त्यांच्यावर होतो.
2 / 8
अभिनेत्री समिरा रेड्डीही (Sameera Reddy) वजन वाढीवरुन ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेग्नंसी आणि पोस्टपार्टमच्या आठवणी शेअर केल्या. 2015 मध्ये मुलाच्या जन्मानंतर तिचं वजन बरंच वाढलं होतं. यानंतर तिला बरंच ट्रोल केलं गेलं.
3 / 8
एका युट्यूब चॅननला दिलेल्या मुलाखतीत समीरा म्हणाली, 'मला माझ्या पहिल्या प्रेग्नंसीवेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. कसे कसे कमेंट्स माझ्यावर केले जायचे. मला पोस्टपार्टम ब्लूजची समस्या होती. माझं वजन प्रचंड वाढलं होतं आणि लोक तर अजिबातच इतके दयाळू नाहीत.'
4 / 8
ती पुढे म्हणाली, 'एकदा तर एका भाजीवाल्यानेच मला विचारलं, दीदी काय झालं हे तुम्हाला? तुम्हीच आहात ना? मला तर आश्चर्यच वाटलं ती भारतीयांमध्ये इतकी हिंमत येते कुठून की तुम्ही बदलला आहात असं त्यांना विचारावं वाटेल.पण मला अशा कमेंट्समुळे फरक पडत नाही. '
5 / 8
लोक माझ्याविषयी काय विचार करतात यातच मी अडकले गेले होते. मी पापाराझीसमोर नर्व्हस व्हायचे. म्हणून मी बाहेर पडायलाही घाबरायचे. आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला स्वत:लाच असं विचारावं वाटतं की समीरा तू स्वत:सोबत असं का केलंस?' असंही ती म्हणाली.
6 / 8
समीरा म्हणाली,' मी सोशल मीडियावरही खूप उशिरा आले. इथेही मी थोडी नर्व्हस असायचे. मी काही ओळखीच्या लोकांकडे शाऊटआऊटसाठी मदत मागितली. मात्र कोणीच पुढे आलं नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीत टॉपची अभिनेत्री होती तेव्हा हेच लोक माझे मित्र होते.'
7 / 8
समीरा आता सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे आता ती मागे वळून पाहत नाही. आयुष्यात आलेल्या अडचणींना तोंड देत ती आता पुढे आली आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कुटुंबासोबतचे तिचे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात.
8 / 8
समीराने 2002 साली 'मैने दिल तुझको दिया' सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. यामध्ये सोहेल खानसोबत तिची जोडी होती. तर 2014 मध्ये तिने अक्षय वर्देसह लग्नगाठ बांधली.
टॅग्स :समीरा रेड्डीबॉलिवूडप्रेग्नंसीट्रोल