मराठी अभिनेत्रीला आला चाहत्याचा विचित्र अनुभव, म्हणाली, "आता अॅसिड अॅटॅक..." By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 1:58 PM1 / 8अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) मराठी सिनेसृष्टीत सध्या आघाडीवर आहे. मालिका, सिनेमा, वेब सिरीज अशा सर्वच क्षेत्रात तिने काम केलं आहे. २०११ साली 'पिंजरा' या मालिकेतून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. यातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.2 / 8यानंतर तिने अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केले. संस्कृतीचा चाहतावर्ग मोठा आहे. सध्या संस्कृती 'चौक' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती महत्वाची भूमिका साकारत आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने तिने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली.3 / 8मुलाखतीत संस्कृतीने अनेक प्रश्नांची धम्माल उत्तरं दिली. मात्र तिने सांगितलेला एका किस्सा सर्वांनाच हादरवून सोडणारा आहे. एका चाहत्याने संस्कृतीला असा काही त्रास दिला की तिला थेट त्याची पोलिसात तक्रार करावी लागली होती. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया.4 / 8संस्कृती म्हणाली, ' असे काही चाहते किंवा लोकं असतात जे तू माझी बायको आहेस तू माझी गर्लफ्रेंड आहेस असे मेसेज करत असतात. तर ते आपण गांभीर्याने घेत नाही कारण हे एक आकर्षण असतं त्या व्यक्तीबद्दल. किंवा आपली एखादी भूमिका पाहून ते कल्पना करतात की हीच माझी बायको.'5 / 8तर तो चाहता मला असे मेसेज करायचा. मी आधी इतकं गांभीर्याने घेतलं नाही. पण त्याने एकदा माझ्या हेअरड्रेसरचा नंबर मिळवून ती माझ्याबरोबर काम करत असताना तिला कॉल केला. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मी म्हणलं ब्लॉक करा हा नंबर. नंतर एकदा त्याचा फोन मला आला. मी खूप नम्रपणे समजावलं की प्लीज यावर फोन करु नका आणि मी नंबर ब्लॉक केला.'6 / 8नंतर काही दिवसांनी एक दिड वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी पुण्यात माझ्या मित्राबरोबर नाश्ता करत होते. मी नेहमीप्रमाणे ती स्टोरी टाकली सोशल मीडियावर. पुण्यातलं लोकेशन टाकलं. थोड्यावेळाने पाहते तर तो अचानक समोरुन चालत आला. त्याचे दोन्ही हात असे मागे होते. त्यामुळे जी धडधड झाली मी त्याच्याजवळ टक लावून बघत होते.7 / 8त्याने मला विचारलं का केलंस तू असं? असं कसं करु शकते तू? मला भीतीच वाटली अशा वेळी आपण नकारात्मक विचार करायला लागतो. म्हणलं आता अॅसिड अटॅक करतो की काय कारण त्याचे हात मागेच होते. पण नशिब तसं काही नव्हतं. माझा मित्र त्याला बाजूला घेऊन गेला. त्याला जरा समजावलं. 8 / 8नंतर तो माणूस दोन वेळा माझ्या घरी आला. घरी आई बाबा माझा भाऊ सगळेच होते. मग मात्र मी त्याची पोलिसात तक्रार केली. तेव्हा कळलं की त्याचे पालक देशाबाहेर राहतात. कदाचित तो मानसिकदृष्ट्या खचलेला असावा असं वाटलं. असं ऐकलं की वाईट वाटतं पण जर तो माझ्या घरापर्यंत येऊ शकतो तर मात्र आपल्या सुरक्षेचा विचार करायला हवा असं मला वाटलं. आणखी वाचा Subscribe to Notifications