Join us

"...म्हणून मी संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नाशी बोललोच नाही", संतोष जुवेकर हे काय बोलून गेला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:48 IST

1 / 7
विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
2 / 7
नुकतीच संतोषने न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोललोही नसल्याचा खुलासा केला.
3 / 7
याचं कारण सांगत अभिनेता म्हणाला, 'सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या त्या कोणाशीच मी बोललो नाही. संपूर्ण शूटिंगमध्ये मी तरी त्या कोणत्याही पात्राशी बोललो नाही'.
4 / 7
'औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो'.
5 / 7
'मी सरांना भेटलो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही'.
6 / 7
'मी बघूच शकत नाही. माझा अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तम काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही'.
7 / 7
'मी त्यांचा द्वेष करत नाही. पण, मी सेटवर एक शब्दही त्यांच्याशी बोललो नाही'.
टॅग्स :'छावा' चित्रपटअक्षय खन्नासंतोष जुवेकर