"तो आला, त्याने मला स्पर्श करायला सुरुवात केली, मी असहाय्य होते, त्यामुळे..." By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:24 PM1 / 9Sanya Malhotra, Molestation in Delhi Metro: आमिर खानच्या 'दंगल'मध्ये काम केलेली सान्या मल्होत्रा तिच्या 'कथाल' या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता सान्या मल्होत्राने असा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.2 / 9सान्याने नुकतेच एका वाईट अनुभवाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, एकदा दिल्ली मेट्रोमध्ये काही मुलांनी तिचा विनयभंग केला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्शही केला. नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घ्या...3 / 9हौटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सान्या मल्होत्रा म्हणाली, 'जेव्हा मी कॉलेजमधून बाहेर पडायचो तेव्हा 7 ते 8 वाजले होते आणि असे अनेक वेळा घडले आहे की लोकांनी मला फॉलो केले आहे. कॉलेज सुटल्यावर मी ग्रीन पार्कवरून मेट्रो पकडली.4 / 9'मी मेट्रोत होते आणि चार-पाच मुलं होती. आता काहीतरी चुकीचं घडू शकतं हे महिलांना कळतं. पण मी एकटी असल्याने गप्प बसले. जेव्हा कोणी तुमच्या सोबत असते तेव्हा तुम्हाला हिम्मत मिळते.'5 / 9सान्या मल्होत्रा पुढे म्हणाली, 'यानंतर त्याने माझी छेड काढली आणि नंतर मला स्पर्श करायला सुरुवात केली. मी असहाय होते. जर मी आणखी ओरडले किंवा वेगळा काही प्रयत्न केला तर या परिस्थितीत काहीही होऊ शकते याची मला भीती होती'6 / 9'लोक म्हणतात तुम्ही कसे काय सहन केले? तू काहीच का केलं नाहीस? पण जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता तेव्हा तुमचे हात-पाय सुन्न पडतात. त्या वेळी असे वाटते की आपण कसे तरी वाचून पळून जावे.'7 / 9अभिनेत्री पुढे म्हणाली, 'मेट्रोमध्ये मला कोणीही मदत केली नाही. तरीही जमेल तसा विरोध करतच होते. मी राजीव चौकात उतरले आणि मग पळू लागले. ती मुलंही माझ्या मागे लागली.'8 / 9'ती मुले 6.2 फूट उंच होती. देवाचे आभार मानते की राजीव चौकात खूप गर्दी होती. त्यामुळे तिथे ती मुलं मला काही करू शकले नाहीत आणि कशीबशी मी वाचले,' असे सान्या म्हणाली9 / 9सान्याने तिच्याबद्दलचा हा किस्सा सांगितल्यामुळे आता पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. (सर्व फोटो- सान्या मल्होत्रा) आणखी वाचा Subscribe to Notifications