Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 12:29 PM1 / 11सरगुन मेहता पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठी स्टार आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती निर्माती देखील आहे. तिने पती रवी दुबेसोबत अनेक शो केले आहेत.2 / 11उडारियां, स्वर्ण घर, जुनूनियत, दालचीनी, बादल पे पांव है यांचा समावेश आहे. या सर्व शोला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.3 / 11अभिनेत्री नेहमीच आपलं मत उघडपणे मांडत असते. मग ते मत प्रोफेशनल लाईफबाबत असो की पर्सनल आयुष्याबाबत.4 / 11सरगुनने Hauterrfly शी केलेल्या संवादात सांगितले होतं की, तिला कॉलेजमध्ये असताना तिला डेटिंग, प्लेजर आणि सेक्स नॉलेज याबाबत अजिबात समज नव्हती.5 / 11'मला अजिबात समज नव्हती. मी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा मला असं वाटायचं की, किस केल्यामुळे मुलं होतात.'6 / 11'मला बेसिक बायोलॉजीही माहीत नव्हती. पार्टनरसोबत बोलल्यानंतरच तिला या सर्व गोष्टी कळल्या' असं सरगुनने सांगितलं. 7 / 11अभिनेत्रीने '12/24 करोल बाग', 'फुलवा', 'बालिका वधू', 'क्या हुआ तेरा वादा', 'रिश्तों का मेला' सारखे टीव्ही शो केले आहेत.8 / 11पंजाबी सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर सरगुन 'किस्मत', 'किस्मत 2', 'अंग्रेज', 'मोह', 'झल्ली'मध्ये दिसली आहे. तिने अनेक हिट पंजाबी म्युझिक व्हिडीओ केले आहेत.9 / 11अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 10 / 11सरगुन मेहताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications