Join us

Saroj Khan Birth Anniversary : ३० वर्षाने मोठ्या व्यक्तीसोबत लग्न, इस्लाम स्वीकारला; मुलांच्या जन्मानंतर पतीने सोडलं एकटं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 3:50 PM

1 / 6
२ हजारपेक्षाजास्त गाणी कोरिओग्रा करणाऱ्या सरोज खान यांचा आज वाढदिवस. मात्र, गेल्यावर्षी ३ जुलैला सरोजजी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सरोज खान यांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना आपल्या तालावर नाचावलं. माधुरी दीक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय यांनी त्यांना आपल्या डान्स गुरू मानलं. ४० वर्षाच्या करिअरमध्ये सरोज खान यांनी तिनदा नॅशनल अवॉर्ड मिळवला. पण त्यांचं पर्सनल लाइफ फारच त्रासात गेलं. केवळ १३ वर्षांची असताना सरोज खान यांचं लग्न झालं. चला जाणून घेऊ त्यांच्या पर्सनल लाइफबाबत....
2 / 6
सरोज खान नव्हतं खरं नाव - सरोज खान यांचं खरं नाव निर्मला नागपाल होतं. सरोज यांच्या वडिलांचं नाव किशनचंद सद्धू सिंह आणि आईचं नाव नोनी सद्धू सिंह होतं. फाळणीनंतर हा परिवार पाकिस्तानातून भारतात आला. सरोज यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सिनेमात काम करणं सुरू केलं.
3 / 6
शाळेत जाण्याच्या वयात सरोजजी यांनी सोहनलालसोबत लग्न केलं होतं. त्यावेळी त्यांना हे माहीत नव्हतं की, सोहनलाल विवाहित आहे आणि त्याला चार मुलं आहेत. दोघांच्या वयात ३० वर्षांचं अंतर होतं. लग्नावेळी सरोजजी यांचं वय १३ वर्षे होतं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मी त्या काळात शाळेत जात होते. तेव्हा एक दिवस माझे डान्स मास्टर सोहनलाल यांनी माझ्या गळ्यात काळा धागा बांधला आणि माझं लग्न झालं होतं'.
4 / 6
१९७४ मध्ये आलेला 'गीता मेरा नामा' हा त्यांचा कोरिओग्राफर म्हणून पहिला सिनेमा होता. मिस्टर इंडियातील हवा-हवाई आणि तेजाबमधील एक दोन तीन गाण्यांनी सरोज खान यांचं नशीब बदललं. यानंतर सरोज खान यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक डान्स नंबर दिले.
5 / 6
सरोज खान यांनी जेव्हा पहिल्या मुलाला जन्म दिला, तेव्हा आपल्या पतीच्या पहिल्या लग्नाबाबत त्यांना समजलं होतं. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला, ते बाळ ८ महिन्यांनंतर मरण पावलं. जेव्हा सोहनलालने दोन्ही मुलांना आपलं नाव देण्यास नकार दिला तेव्हा दोघेही वेगळे झाले.
6 / 6
. दोघांचं लग्न केवळ ४ वर्ष चाललं. इस्लाम धर्म स्वीकारण्याबाबत सरोज खान म्हणाल्या होत्या की, 'मी माझ्या मर्जीने इस्लाम कबूल केला होता, मला इस्लाममधून प्रेरणा मिळते. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता'.
टॅग्स :सरोज खानबॉलिवूड