मैत्रीसाठी कायपण! गर्भवती असलेल्या 'या' अभिनेत्रीशी लग्न करायला तयार झाले होते सतीश कौशिक By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2023 9:45 AM1 / 10बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कौशिक यांनी अचानक घेतलेल्या एक्झिटने बॉलिवूडला धक्का बसला आहे. कौशिक यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, आठवणी ताज्या झाल्या आहेत. 2 / 10यापैकी एक किस्सा म्हणजे अभिनेत्री नीना गुप्ताबरोबर लग्न करण्याची त्याची इच्छा होती. होय, शशी कौशिकबरोबर लग्न करण्यापूर्वी सतीशने नीना यांना लग्नाचा प्रस्ताव दिला होता, परंतु अभिनेत्रीने त्यांची ऑफर नाकारली. त्यावेळी नीना लग्न न होता गर्भवती होत्या. 3 / 10सतीश कौशिक आणि नीना गुप्ता दोघेही चांगले मित्र होते. त्यावेळी नीना कठीण काळातून जात होती. लग्न न होता नीना गर्भवती झाली होती. त्यामुळे समाजात तिची प्रतिमा मलिन झाली होती. लोकांच्या टोमण्यांमुळे ती एकटी पडली होती. 4 / 10अशा परिस्थितीत सतीशने नीनाला लग्नासाठी ऑफर केले. नीनाला एकटेपणाची जाणीव होऊ नये अशी सतीश कौशिक यांची इच्छा होती. एक मित्र म्हणून ते नीनासोबत उभे राहिले. एका मुलीने लग्न न करता मुलाला जन्म देण्याचा घेतलेल्या निर्णयाचं कौशिक यांनी कौतुक केले होते. 5 / 10सतीश कौशिक यांनी नीना गुप्ताला सांगितले होते, 'मी आहे, तू काळजी का करतेस? जर मुलाचा रंग गडद रंगाचे असेल तर आपण लग्न करू आणि कोणालाही शंका येणार नाही. ज्यावेळी चहुबाजूने नीनावर टीका होत होती तेव्हा मित्राच्या तोंडातून हे शब्द ऐकल्यानंतर नीनाच्या डोळ्यात अश्रू आले 6 / 10८० च्या दशकात नीना स्टार क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्सवर फिदा झाली होती आणि ती गर्भवती झाली. विव्हियन आधीच लग्न झाले होते, म्हणून ती त्याच्याशी लग्न करू शकली नाही. अशा परिस्थिती तिने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. नीनाने २००८ मध्ये विवेक मेहराशी लग्न केले.7 / 10अभिनेते सतीश कौशिक यांचे १९८५ मध्ये शशि कौशिक यांच्याशी लग्न झाले. या दोघांना १९९४ मध्ये मुलगा झाला होता. परंतु अवघ्या २ वर्षात या मुलाचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर सतीश कौशिक पूर्णपणे खचले होते. या घटनेने सतीश कौशिक मानसिकदृष्ट्या हादरले होते. ज्यातून त्यांना बाहेर पडायला खूप काळ लागला. 8 / 10त्यानंतर कौशिक यांच्या घरी १६ वर्षांनी लहान मुलाचा आवाज ऐकायला मिळाला. तब्बल १६ वर्षांनी २०१२ मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून कौशिक यांच्या घरी मुलीने जन्म घेतला. मुलीच्या जन्मानंतर घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 9 / 10खूप कमी लोकांना माहिती आहे की, सतीश कौशिक यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 10 / 10त्यानंतर रूप की रानी, चोरों का राजा या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले. सिनेमात कॉमेडी करूनही त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications