Happy Birthday Sayaji Shinde: सयाजी शिंदे यांना असा मिळाला होता ‘शूल’ सिनेमा, इंटरेस्टिंग आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:02 PM2023-01-13T14:02:59+5:302023-01-13T14:24:26+5:30

Happy Birthday Sayaji Shinde: हिंदी,मराठी तसेच साऊथ सिनेमांमधून एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारणारे सयाजी शिंदे एक हरहुन्नरी अभिनेते. आज त्यांचा वाढदिवस.

हिंदी,मराठी तसेच साऊथ सिनेमांमधून एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारणारे सयाजी शिंदे एक हरहुन्नरी अभिनेते. आज त्यांचा वाढदिवस.

सयाजी यांच मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं वेळेकामठी. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी गाव सोडलं आणि सातारा गाठलं.

मावशी आणि बहिणीच्या सहाय्याने सयाजी यांनी कसंबसं १० वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. याचदरम्यान जलसंपदा खात्यात त्यांना वॉचमन म्हणून नोकरी मिळाली.

घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी ३ वर्षे वॉचमनची नोकरी केली. नोकरी करता करता मराठी विषयात ग्रॅज्युएशन केलं.

कॉलेज जीवनापासूनच त्यांना नाटकाची, अभिनयाची आवड निर्माण झाली. इतकी की नाटकं वाचण्यासाठी शांत जागा हवी म्हणून ते माटुंगा स्टेशनवर बसून राहायचे.

शूल या चित्रपटात त्यांना बच्चू यादवची भूमिका मिळाली. याचा किस्सा चांगलाच इंटरेस्टिंग आहे. तर शूलसाठी कास्टिंग सुरु होतं...

मनोज वाजपेयी या चित्रपटाचा हिरो होता. रामगोपाल वर्मा निर्माते होते. पण बच्चू यादवच्या भूमिकेसाठी कुणी मिळत नव्हतं.

एकदा मनोज वाजपेयींची नजर एका मराठी नाटकाच्या पोस्टरवर गेली. त्यातल्या अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे रासवट भाव पाहून त्यांन थेट बच्चू यादव आठवला.

मग काय नाटकाच्या पोस्टरवरच्या त्या अभिनेत्याला हुरडून काढलं गेलं. तो अभिनेता कोण तर सयाजी शिंदे.

रामगोपाल वर्माच्या ऑफिसमधली सयाजी यांची एन्ट्री इतकी दमदार होती की, त्याची स्टाईल बघताच रामगोपाल वर्मानी हाच आपला बच्चू यादव हे ठरवून टाकलं.

शूलमध्ये सयाजी शिंदे यांनी साकारलेला बच्चू यादव प्रचंड गाजला. या भूमिकेने सयाजी यांना नवी ओळख दिली. सयाजी शिंदे आज ६४ वर्षांचे झाले आहेत. शुटिंमधून वेळ मिळाला कि सयाजी शिंदे निसर्गाच्या सानिध्यात रमतात.