Sayali Sanjeev: अशोक सराफ यांच्या 'या' सल्ल्यामुळे बदललं सायली संजीवचं आयुष्य! By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 7:00 AM1 / 10काहे दिया परदेस मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीवने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे.2 / 10अभिनयाशिवाय सायली तिच्या सुंदर, सोज्वळ सौंदर्याने तरुणाईला भुरळ पाडत असते. नुकताच सायलीचा गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट रिलीज झाला. 3 / 10सायली संजीव ही अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची मुलगी असल्याचे अनेकांना वाटते. मात्र सायली अशोकमामांची मुलगी नसली तरीही सायली आणि अशोकमामांचं नातं खूप खास आहे. ती त्यांना अशोक पप्पा म्हणते. 4 / 10अशोक सराफ यांच्या मोलाच्या सल्ल्यामुळे सायली संजीवचं आयुष्य बदललं. खुद्द याबाबत तिनेच खुलासा केला.5 / 10एका मुलाखतीत सायली संजीवनं तिच्या यशस्वी होण्यामागे दोन महत्त्वाच्या व्यक्तींचा हात असल्याचं सांगितलं. या दोन व्यक्ती म्हणजे सायलीचं वडील संजीव आणि दुसरे सर्वांचे लाडके अशोक सराफ. 6 / 10मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं होतं, तू जे काही काम घेतेस त्यात तुझं तू 100 टक्के तुझं योगदान दे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड कधीच करू नकोस. असाच सल्ला सायलीच्या वडिलांनी तिला दिला होता.7 / 10दरम्यान, या दोघांनी दिलेला सल्ला मी कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न करते, असे सायली सांगते. 8 / 10मी जे काम करते ते समजून घेऊन काम करते, कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही, असेही तिने सांगितले. 9 / 10सायली संजीवने मालिकेतून करिअरची सुरूवात केली. 10 / 10गोष्ट एका पैठणीची चित्रपटाशिवाय सायली संजीव झिम्मा, दाह, बस्ता या चित्रपटात झळकली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications