सायली संजीवनं ऋतुराजसोबतच्या नात्याबाबत केला होता मोठा खुलासा, म्हणाली - 'मी २९ वर्षांची आणि तो...' By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 11:30 AM1 / 10सध्या आयपीएल सामन्यांची सगळीकडे धूम पाहायला मिळत आहे. त्यात अभिनेत्री सायली संजीव हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला एक फोटो शेअर केला आणि मग काय पुन्हा चर्चेला उधाण आले.2 / 10 काही वर्षापूर्वी आयपीएल सामन्यात खेळणारा ऋतुराज गायकवाड याने मराठी चित्रपट अभिनेत्री सायली संजीव हिच्या एका फोटोवर एक कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देत सायलीने देखील हार्टचे इमोजी दिले होते या एका गोष्टीवरून सायलीच्या चाहत्यांमध्ये या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली. 3 / 10ऋतुराज गायकवाड सायलीच्या प्रेमात आहे अशा बातम्या सगळीकडे व्हायरल झाल्या तेव्हा मात्र चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स आणि या बातम्या पाहून ऋतुराजने आपली कमेंट डिलीट केली. त्यानंतरही अनेकदा सायलीला ऋतुराजच्या नावावरून चिडवण्याचा प्रयत्न झाला. 4 / 10हा मुद्दा सुबोध भावेने बस बाई बस या शोमध्ये काढला होता आणि तुमचं अफेअर आहे का? असे सायलीला विचारले होते. त्यावेळी सायलीने उत्तर दिले होते की , ‘ ऋतुराज गायकवाड आणि तुषार देशपांडे हे दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत. हे दोघेही माझी काहे दिया परदेस ही मालिका बघत होते. तेव्हापासून हे दोघेही माझे चाहते झाले होते. परंतु क्रिकेटर मालिका कुठे बघत असतील कारण त्यांना तेवढा वेळही मिळत नसतो असे मला वाटायचं.5 / 10ऋतुराज बद्दल सांगायचं तर तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे आणि आमच्यात केवळ मैत्री आहे, असे म्हणत तिने या विषयाला पूर्णविराम लावला होता.6 / 10ऋतुराजने एका सामन्यात सात सिक्स मारून रेकॉर्ड बनवला तेव्हा सायलीचे नाव पुन्हा त्याच्यासोबत जोडण्यात येऊ लागले. यावर आता सायलीने मौन सोडण्याचे ठरवले आहे. 7 / 10गोष्ट एका पैठणीची सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सायलीला पुन्हा ऋतुराजच्या नात्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने या चर्चेला आता पूर्णविराम देणारे उत्तर दिलेले पाहायला मिळाले. 8 / 10सायली म्हणाली की, ‘ ऋतुराज आणि आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. आम्ही एकमेकांसोबत बोलतही होतो मात्र जेव्हापासून आमच्या नात्याला एक वेगळा अर्थ लावण्यात आला तेव्हापासून आमच्या मैत्रीच्या नात्यात दुरावा येत गेला. आमच्या निखळ मैत्रीवर त्याचा खूप वाईट परिणाम झाला. माझं नाव त्याच्यासोबत जोडलं जातंय हे पाहून आम्ही आता मित्रासारखं धड बोलु ही शकत नाही आहोत. 9 / 10ती पुढे म्हणाली की, मी २९ वर्षांची आहे आणि तो २५ वर्षांचा आहे याबद्दल देखील मी वेळोवेळी खुलासा केला होता. 10 / 10याबाबत अनेक चर्चाही पाहायला मिळाल्या परंतु आता आमच्यातील हे मैत्रीचं नातं इतकं दूर गेलं आहे की आमच्यात आता काहीच बोलणं देखील होत नाही. या सगळ्या चर्चेमुळे आमच्या मैत्रीच्या नात्यावर परिणाम झाला आहे’. आणखी वाचा Subscribe to Notifications