1 / 10शाहिरला प्रेमात क्लीन बोल्ड करणारी कोण तर रूचिका कपूर. होय, कालपरवा शाहिरने रूचिकासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.2 / 10खरे तर शाहिरला आपल्या पर्सनल लाईफबद्दल फार आवडत नाही. पण तरीही त्याने प्रेमाची जाहीर कबुली दिली.3 / 10शाहिर व रूचिका येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. अर्थात अद्याप दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.4 / 10शाहिर व रूचिका दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.5 / 10शाहिरची गर्लफ्रेन्ड रूचिका ही एकता कपूरची अगदी जिवाभावाची मैत्रिण आहे. अनेकांना दोघी एकमेकींसोबत दिसतात.6 / 10रूचिका कपूर ही एकताच्या बालाजी मोशन पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये क्रिएटीव्ह प्रोड्यूसर व एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आहे.7 / 10एकताच्या घरच्या प्रत्येक कार्यक्रमात रूचिका कपूर दिसते. 2014 मध्ये ती एकताच्या कंपनीत रूजू झाली होती.8 / 10लिपस्टिक अंडर माय बुर्का, वीरे दी वेडिंग, हाफ गर्लफ्रेन्ड, एक विलेन अशा अनेक चित्रपटांची मार्केटींग हेड म्हणून रूचिकाने काम केले आहे.9 / 10ऐकून आश्चर्य वाटेल पण अनेक सिनेमांतही रूचिकाने काम केलेआहे. मेंटल है क्या, जबरिया जोडी, डॉली किट्टी, ड्रीम गर्ल या सिनेमांत तिने भूमिका साकारल्या आहेत.10 / 10शाहिर शेखने ‘ये रिश्ते हैं प्यार के’ या मालिकेतून आपल्या अबीरच्या व्यक्तिरेखेने त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. शाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो. इंडोनेशिया मध्ये देखील त्याला चांगलीच लोकप्रियता आहे.