Join us

50 सेकंदात 5 कोटी कमावते शाहरुखची हिरोईन; प्रायव्हेट जेटसह कोट्यवधींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 3:27 PM

1 / 10
नयनतारा ही साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिला लेडी स्टार म्हणून ओळखली जाते. शाहरुख खानसोबत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत.
2 / 10
एक्शन सीन्स पाहून सर्वजण प्रभावित झाले आहेत आणि ती एक बिझनेसवुमन देखील आहे. नयनताराच्या अदा पाहून चाहते घायाळ होतात. आपल्या अभिनयाने तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3 / 10
नयनतारा अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे. ती अल्लू अर्जुन आणि राम चरण सारखी प्रायव्हेट जेटची मालकीण आहे. तसेच कोट्यवधींची संपत्ती देखील आहे.
4 / 10
नयनतारा ही साऊथची सर्वात महागडी अभिनेत्री असून ती एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेते. शाहरुखच्या जवानकडूनही तिला तेवढीच रक्कम मिळाली होतीतिला जाहिरातींमधूनही चांगली कमाई करते.
5 / 10
न्यूज18 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नयनतारा 50 सेकंदाच्या जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेते. सहसा ती एका जाहिरातीसाठी 4-7 कोटी रुपये घेते.
6 / 10
नयनतारा 4 आलिशान घरांची मालकीण आहे, त्यापैकी एक मुंबईत आहे, ती पती विघ्नेशसोबत 4 BHK फ्लॅटमध्ये राहते. रिपोर्ट्सनुसार या फ्लॅटची किंमत 100 कोटी रुपये आहे.
7 / 10
फ्लॅटच्या आत एक सिनेमा हॉल, स्विमिंग पूल आणि मल्टीफंक्शनल जिम आहे. तिच्याकडे हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये 30 कोटी रुपयांच्या दोन अपार्टमेंट आहेत. अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक अपार्टमेंट खरेदी केली होती.
8 / 10
नयनताराकडेही अनेक शानदार कार आहेत. तिच्या सर्वात महागड्या कारची किंमत 1.76 कोटी रुपये आहे आणि ती BMW 7 सीरीजची कार आहे. तिच्याकडे 1 कोटी रुपयांची मर्सिडीज GLS350D देखील आहे.नयनताराकडे BMW 5 सीरीजची कार देखील आहे.
9 / 10
रिपोर्ट्सनुसार, नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे. नयनतारा शाहरुख खानसोबत ब्लॉकबस्टर जवान मध्ये दिसली होती. एटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनताराने एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 10
टॅग्स :नयनताराबॉलिवूड