Dunki Movie: शाहरुखचा 'डंकी' येतोय, पण सिनेमाच्या नावाचा अर्थ नक्की आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 16:44 IST
1 / 8बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) 2023 हे वर्ष फारच खास ठरलंय. ४ वर्षांच्या ब्रेकनंत त्याने यावर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' सिनेमातून धुमाकूळ घातला तर काहीच महिन्यात 'जवान' मधून तो भेटीला आला. आता त्याचा 'डंकी' (Dunki) हा सिनेमा रिलीज होणार आहे.2 / 8राजकुमार हिरानींच्या 'डंकी' सिनेमात पहिल्यांदाच शाहरुख खान त्यांच्यासोबत काम करत आहे. गेल्यावर्षीच हिरानी आणि शाहरुखने एका मजेशीर जाहिरातीतून या सिनेमाची घोषणा केली होती.3 / 8आज शाहरुख ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने 'डंकी' सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करण्यात आलाय. किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना हे सरप्राईजच मिळालं आहे. 4 / 8चार मित्र ज्यांना लंडनला जायचं असतं मात्र अनेक अडचणी येत असतात. शाहरुख खान या मित्रांना लंडनला पाठवण्यासाठी धडपडत असतो. या चार मित्रांमध्ये तापसी पन्नू आणि विकी कौशल यांचा समावेश आहे.5 / 8सिनेमा नक्की काय असणार आहे हे तर टीझरमधून थोडंफार स्पष्ट होतंय. पण सिनेमाच्या नावाचा नेमका अर्थ काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.6 / 8डंकी नावाचा अर्थ हा डंकी (डॉन्की) फ्लाईटशी आहे. हा पंजाबी शब्द आहे. म्हणजेच जेव्हा एखाद्याला परदेशात जायचे असेल पण त्याला कायदेशीर पद्धतीने जाता येत नाही तेव्हा ते अनधिकृतरित्या चालतच निघतात. त्याला 'डंकी फ्लाईट' असं म्हटलं जातं. 7 / 8हा प्रकार मधल्या काळात खूपच चर्चेत आला होता. अनेक तरुण डंकी फ्लाईटद्वारे कॅनडा आणि युएस मायग्रेट करतात. शाहरुखचा सिनेमा याच विषयावर आधारित असल्याचं दिसतंय. वाळवंटात काही लोक लाइनने पाठीवर ओझं घेऊन जात आहे आणि त्यांच्यावरून एक विमान जात आहे. असा सिनेमाचा प्रोमो आपण पाहिलाच आहे.8 / 8'डंकी' २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमाही हिट झाला तर यावर्षातला हा शाहरुखचा सलग तिसरा सुपरडुपर हिट सिनेमा ठरणार आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.