Join us  

'माझ्याशी लग्न कर..'; अफेअरच्या चर्चेदरम्यान शाहरुखने भर कार्यक्रमात प्रियंकाला केलं होतं लग्नासाठी प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 4:08 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आज ४१ वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंकाचा जन्म 18 जुलै 1982 साली झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला होता. प्रियंका चोप्रा बॉलिवूडनंतर हॉलिवूड गाजवत आहे.
2 / 9
सध्या प्रियंका पती निक आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेत राहते. निक जोनासशी लग्न करण्यापूर्वी प्रियंकाचं नाव अनेक अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं. या यादीत बॉलिवूडचा बादशाह किंग खानचं नाव देखील आहे.
3 / 9
असं म्हणतात की शाहरुख आणि प्रियांकामध्ये एवढी जवळकी वाढली होती की त्याने तिला थेट लग्नाची मागणी घातली होती.
4 / 9
प्रियंकाने डॉन या चित्रपटात खूप चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या वेळेस शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात होते.
5 / 9
रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राच्या जवळीकीच्या बातम्यांमुळे शाहरुखचे घर तुटण्याच्या मार्गावर होते.
6 / 9
शाहरुखचा खास मित्र करण जोहर आणि गौरीने मिळून हे प्रकरण हाताळले. करण जोहरमुळे प्रियंका चोप्राला बॉलिवूड सोडवा लागलं याची चर्चा अनेकवेळा होते.
7 / 9
शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शाहरुख प्रियंकासाठी गाणं गाताना दिसत होता. शाहरुख प्रियंकाला ‘मॅरी मी मॅरी मी’ म्हणताना दिसत होता. शाहरुखच्या या वाक्यानंतर प्रियांका त्याच्याकडे आश्चर्याने बघताना आणि हसताना दिसली होती.
8 / 9
प्रियंका चोप्राने एक मुलाखती दरम्यान एका जॅकेटचा उल्लेख केला होता. हे जॅकेट प्रियंकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे असल्याचं सांगितलं होते. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
9 / 9
मीडिया रिपोर्टनुसार हे जॅकेट शाहरुख खानचे होते. अनेकदा त्याने अगदी सेम टू सेम जॅकेट घातले होते.
टॅग्स :प्रियंका चोप्राशाहरुख खान