Join us

सिनेमात जिच्या आजोबांची भूमिका साकारली तिच्याशीच केलं लग्न, दोघांमध्ये तब्बल १२ वर्षांचं अंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 9:21 AM

1 / 8
बॉलिवूडमध्ये अनेक अशा जोड्या आहेत ज्यांच्या वयात कमालीचं अंतर आहे. तसंच त्यांचं पडद्यावरचं आयुष्य आणि पजद्यामागचं आयुष्य यात कमालीचा फरक असतो. कोण कधी कोणाच्या प्रेमात पडेल आणि कोण कधी ब्रेकअप करेल सांगता येत नाही.
2 / 8
बॉलिवूडची अशीच एक जोडी आहे शक्ती कपूर (Shakti Kapoor) आणि शिवांगी कोल्हापुरे (Shivangi Kolhapure) यांची. शक्ती कपूर पंजाबी कुटुंबातले तर शिवांगी मराठी कुटुंबात वाढलेली. दोघांच्या वयात तब्बल १२ वर्षांचं अंतर मात्र एकमेकांवरील प्रेमामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केलं.
3 / 8
शिवांगीने बालवयातच अभिनयाला सुरुवात केली होती. तिने 'दो अंजाने,'बारुद','किस्मत' अशा काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'किस्मत' या सिनेमात शक्ती कपूर आणि शिवांगी दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.
4 / 8
शक्ती कपूर आणि शिवांगी यांची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे. एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणाले, 'एका सिनेमात शिवांगी बालकलाकार होती आणि मी तिच्या आजोबांची भूमिका साकारत होतो. तिथेच आमची पहिली भेट झाली आणि आम्ही एकमेकांना पसंत करु लागलो. पण माझी इमेज खलनायकाची असल्याने आणि वयात खूप अंतर असल्याने शिवांगीच्या घरच्यांनी आमच्या नात्याला जोरदार विरोध केला.'
5 / 8
ते पुढे म्हणाले, 'आमची लव्हस्टोरी रोमिओ ज्युलिएट सारखीच आहे. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. शिवांगी फक्त १८ वर्षांची होती जेव्हा आम्ही 1982 साली पळून जाऊन लग्न केलं. लग्नानंतर तिने सिनेमांमध्ये काम बंद केलं. लग्नानंतर दोनच वर्षात आम्हाला मुलगा झाला. तेव्हा कुठे शिवांगीची आई तिला भेटायला रुग्णालयात आली. यानंतर तीन वर्षांनी श्रद्धाचा जन्म झाला.'
6 / 8
शिवांगी कोल्हापुरे गानकोकिळा लता मंगेशकर यांची भाच्ची आहे. केवळ याच कारणामुळे शक्ती कपूर यांनी शिवांगी आणि शक्ती यांच्या लग्नाला होकार दिला होता असं शक्ती कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. कारण त्यांचे वडील सिकंदर लाल कपूर हे लता मंगेशकर यांचे मोठे चाहते होते.
7 / 8
शिवांगी स्वत: गायिका आहे. तिने शक्ती कपूरच्या वडिलांना गाणं गाऊन दाखवलं तेव्हाच त्यांनी लग्नाला होकार दिला होता. तिचा साधेपणा आणि लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील मुलगी आहे म्हणत ते शक्ती कपूर यांच्यावर खूश झाले होते.
8 / 8
आज शक्ती आणि शिवांगी यांची मुलं मोठी झाली आहेत. मुलगी श्रद्धा कपूर तर बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. शक्ती कपूर यांनी अनेक सिनेमात काम केले तर शिवांगी यांनी मात्र घर संसारात लक्ष दिले तसंच आपला वेगळा मार्ग निवडला.
टॅग्स :शक्ती कपूरश्रद्धा कपूरबॉलिवूडदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टपरिवार