Romantic Photo : ‘या’ हँडसमसोबत धुमधडाक्यात होणार होते शमा सिकंदरचे लग्न, पण...!! By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 2:18 PM1 / 11अभिनेत्री शमा सिकंदर बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.2 / 11शमा दीर्घकाळापासून अमेरिकन बिझनेसमॅन जेम्स मिलिरॉनला डेट करतेय.3 / 11अनेक वर्षे डेट केल्यानंतर 2016 साली दोघांचा साखरपुडा झाला होता.4 / 11यानंतर या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोघेही लग्न करणार होते. पण लॉकडाऊनमुळे सप्टेंबरमधील या लग्नाची सुुरू असलेली तयारी तूर्तास थांबवण्यात आली आहे.5 / 11आमच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. सप्टेंबरच्या शेवटी आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करणार होतो. पण कोरोना आल्यामुळे सध्या सगळे काही ठप्प आहे, असे शमाने सांगितले.6 / 11जेम्सच्या आईवडिलांकडे पासपोर्ट नव्हता. ते पासपोर्ट काढणार असताना कोरोना महामारी सुरु झाली. आमच्या मते, आणखी काही महिने तरी प्रवास करणे योग्य नाही, असेही तिने सांगितले.7 / 11जेम्स माझ्यासोबत मुंबईत आहे. पण त्याचे आईवडिल अमेरिकेत आहेत. कोरोनामुळे अमेरिकेतील स्थिती भीषण आहे. अशास्थितीत आम्हाला त्या दोघांचीही काळजी वाटते आहे, असेही ती म्हणाली8 / 11या कोरोनाच्या काळात जेम्स माझ्यासोबत आहे, हे भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूप समाधानाची बाब आाहे. आम्ही दोघेही नवे बदल स्वीकारत आहोत, असेही तिने सांगितले.9 / 11शमा सिकंदर ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.10 / 11ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमधून शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती.11 / 11आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्येही शमा दिसली होती. शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications