Sharmin Segal have been in industry since 10 year still hasn't given any hit movie
अभिनेत्रीला फिल्म इंडस्ट्रीत झाली तब्बल १० वर्ष, एकही हिट सिनेमा नाही; नेपोटिझममुळे आली चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:19 AM1 / 8फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझमचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो. स्टार कलाकारांच्या मुलांना इंडस्ट्रीत सहज संधी मिळते. तर आऊटसाइडर्सना मात्र पहिल्या ब्रेकसाठी खूप संघर्ष करावा लागतो.2 / 8बॉलिवूडमध्ये अशी एक अभिनेत्री आहे जी नेपोटिझममुळे इंडस्ट्रीत आली. विशेष म्हणजे पदार्पण केल्यापासून तिने एकही हिट सिनेमा दिलेला नाही. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या सुपरहिट सिनेमात तिने भूमिका साकारली. मात्र तिला अभिनयामुळे चांगलंच ट्रोल केलं गेलं. 3 / 8ही अभिनेत्री आहे शर्मिन सहगल (Sharmin Segal). शर्मिनला इंडस्ट्रीत १० वर्ष झाली आहेत. यादरम्यान तिने केवळ २ सिनेमे केले. यातही तिने असिस्टंट डायरेक्टरचं काम केलं. नंतर २०१९ साली तिने 'मलाल' सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. तिचा पहिलाच सिनेमा आपटला. 4 / 8२०२२ मध्ये तिचा दुसरा सिनेमा 'अतिथी भूतो भव' रिलीज झाला. हा ओटीटीवर रिलीज झाला होता. मात्र हाही फ्लॉप झाला. २०२३ मध्ये ती एका करोडपती बिझनेसमनसोबत लग्नबंधनात अडकली. 5 / 8शर्मिन संजय लीला भन्साळींची भाची आहे. तिने भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी','मेरी कोम' सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं. तर नुकतीच ती त्यांच्या 'हिरामंडी' वेबसीरिजमध्ये दिसली.6 / 8सीरिजमध्ये तिने आलमजेब ही भूमिका साकारली. मात्र तिला अभिनयामुळे खूप ट्रोल केलं गेलं. सीरिजमध्ये तिचाच अभिनय कोणालाही आवडला नाही. 7 / 8शर्मिन सहगलची आई बेला सहगल या फिल्म एडिटर आहेत. भन्साळींच्या त्या धाकट्या बहीण आहेत. तर वडील दीपक सहगल फिल्म एक्झिक्युटीव्ह आहेत. 8 / 8फिल्मी परिवारमधून येऊनही शर्मिनला बॉलिवूडमध्ये आपली जागा बनवता आली नाही. शर्मिनचे पती अमन मेहता श्रीमंत बिझनेसमन आहेत. त्यांची नेटवर्थ ५३,८०० रुपये इतकी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications