Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:42 IST
1 / 13अभिनेत्री शर्वरी वाघने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. पण शर्वरीसाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अत्यंत मेहनतीने तिने हे यश मिळवलं आहे. 2 / 13शर्वरीने एका मुलाखतीत तिच्या संघर्षांबद्दल सांगितलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात किती अडचणी आल्या याबाबत सांगितलं आहे.3 / 13बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रवासाबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, 'प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष असतो आणि अडचणी असतात.'4 / 13'हो, मी हे सांगू इच्छिते की, मला ज्या प्रकारचं काम करायचं होतं ते शोधण्यात मला खूप अडचणी आल्या.'5 / 13'मुंबईत घर असल्याने खूप मोठा फायदा झाला. या गोष्टीमुळे कायम संयम राखण्यात आला.'6 / 13'मला एक चांगला प्रोजेक्ट मिळेपर्यंत मी वाट पाहू शकत होते. हा एक मोठा विशेषाधिकार आहे.'7 / 13'गेल्या ५ वर्षात माझ्यासाठी सर्वात कठीण गोष्ट म्हणजे मी दररोज ऑडिशनसाठी जायचे आणि मला चित्रपट, जाहिरातींमध्ये रिजेक्शन मिळायचं.'8 / 13'मला असं वाटत होतं की, मी दररोज परीक्षेत नापास होत आहे. पण तरीही प्रत्येक ऑडिशनमध्ये मी स्वतःला सांगायचे की, हा माझा चित्रपट आहे' असं शर्वरीने म्हटलं आहे.'9 / 13सार्वजनिक ठिकाणी आपल्या संघर्षांबद्दल जास्त का बोलत नाही याचं कारण शर्वरीने सांगितलं आहे. 10 / 13'माझ्या आईने मला मी असताना शाळेत काहीतरी सांगितलं होतं, जे अजूनही माझ्यासोबत आहे.'11 / 13'आई म्हणाली होती- स्वतःला कधीही विक्टिम बनू देऊ नका. याचा चित्रपट इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही, पण तरीही आईचा हा सल्ला मनात घर करून राहिला आहे' असं अभिनेत्रीने म्हटलं. 12 / 13शर्वरी वाघ सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. 13 / 13