शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर केंडल त्यांना समजायच्या गे, त्यांनीच सांगितली होती ही गोष्ट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:14 PM1 / 9शशी कपूर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले.2 / 9शशी कपूर यांचे लग्न जेनिफर केंडल यांच्यासोबत झाले होते. त्यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. 3 / 9जेनिफर आणि शशी कपूर यांच्या प्रेमकथेविषयी रंजक गोष्टी जेनिफर यांची बहीण फॅलिसीटीने व्हाईट कार्गो या पुस्तकात लिहिल्या आहेत. 4 / 9या पुस्तकात त्यांनी नमूद केले आहे की, जेनिफर त्याच्या मैत्रिणींसोबत ऑपेरा हाऊसमध्ये नाटक पाहायला गेल्या होत्या. तिथेच शशी कपूर यांनी पहिल्यांदा त्यांना पाहिले आणि पाहाताचक्षणी ते जेनिफर यांच्या प्रेमात पडले. 5 / 9शशी यांनी जेनिफर यांना पहिल्यांदा पाहिले, त्यावेळी ते स्टार नव्हते. त्यामुळे त्यांना जेनिफर यांच्यासोबत ओळख करायला खूप वेळ लागला. 6 / 9जेनिफर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. केवळ त्यांना पाहाण्यासाठी शशी नाटकाला जायचे. पण जेनिफर यांनी त्यांना कधी नोटिस केले नाही. 7 / 9जेनिफर यांना अनेकवेळा पाहिल्यानंतर शशी यांनी ऑपेरा हाऊसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.8 / 9या भेटीनंतर जेनिफर आणि शशी अनेकवेळा भेटायला लागले आणि काहीच काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 9 / 9शशी कपूर खूप लाजाळू होते. ते जेनिफरसोबत बोलायला देखील लाजत असे. जेनिफर यांना शशी असे का वागत आहे हे कळत नसल्याने त्या शशी यांना गे समजायला लागल्या होत्या. शशी कपूर यांनी त्यांच्या पुस्तकात या गोष्टीविषयी नमूद केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications