Shehnaaz Gill : "त्याला हवं असेल तर...": शहनाज गिलच्या आयुष्यातला मिस्ट्री मॅन कोण, कधी करणार लग्न? By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 1:21 PM1 / 10पंजाबी इंडस्ट्रीमधून हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणारी शहनाज गिल सध्या अमेरिकेला गेली आहे. ती तिथे चाहत्यांना भेटते आणि कार्यक्रमांनाही हजेरी लावते.2 / 10यूट्यूब व्लॉगिंगच्या माध्यमातून ती चाहत्यांना अमेरिकेशी संबंधित काही अपडेट्स देताना दिसत आहे. नुकतंच शहनाजने हेही सांगितलं की ती नेमकी कधी लग्न करणार आहे.3 / 10एका फॅनशी संवाद साधताना शहनाज तिच्या मिस्ट्री मॅन आणि लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली - मला साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे, पण जर मुलाला हवं असेल तर आम्ही धूमधडाक्यात देखील लग्न करू शकतो.4 / 10'लग्न साधं पद्धतीने होवो किंवा स्वप्नवत होवो, काहीही असो, एका पॉईंटवर लग्न व्हायलाच हवं. पण लग्नाला अजून बराच वेळ आहे. लग्नाबद्दल बोललं नाही तर चांगलं.'5 / 10'जर मला एखादा मुलगा सापडला आणि तो लग्नासाठी तयार असेल तर मी त्याला विचारेन की, त्याला कोणत्या पद्धतीने आणि कसं लग्न करायचं आहे.'6 / 10'जर एखादा मुलगा साधा असेल तर आम्ही साध्या पद्धतीने करू. जर त्याला धुमधाम पद्धतीने करायचं असेल तर आम्ही त्याच्या इच्छेनुसार तसं करू. मला काहीच अडचण नाही' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.7 / 10आजही शहनाज गिल तिचा मित्र सिद्धार्थ शुक्ला याच्या आठवणीत भावूक होते. शहनाजने ती नेमकं कधी लग्न करणार आहे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.8 / 10शहनाज नेमक्या कोणत्या मिस्ट्री मॅनला डेट करत आहे हे देखील तिने सांगितलं नाही. रिपोर्टनुसार शहनाजचं नाव अभिनेता राघव जुयालसोबत जोडलं जात आहे.9 / 10शहनाज सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते असून ते तिच्या अदांवर घायाळ होतात. 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications