Join us

Miss Little Miracle : कोण आहे शर्ली टेंपल; जिच्यासाठी गुगलने बनवले खास डूडल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 1:52 PM

1 / 11
खास दिवस म्हटल्यावर गुगलचे खास डूडल दिसणारच. गुगलने आज एक खास अ‍ॅनिमेटेड डूडल साकारले आहे. कुणाचे तर अमेरिकी अभिनेत्री, गायक, नृत्यांगणा शर्ली टेंपलचे.
2 / 11
गुगलच्या डूडलसोबत सन्मानित केलेली ही शर्ली टेंपल (Shirley Temple) कोण आहे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 2015 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 9 जूनला शर्लीच्या आठवणीत ‘लव्ह शर्ली टेंपल’ या संग्रहालयाची सुरूवात केली होती. यात शर्लीच्या काही स्मृती जतन करून ठेवलेल्या आहेत. याची आठवण म्हणून गुगलने हे खास डूडल साकारले आहे.
3 / 11
वयाच्या उण्यापुºया चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनयास सुरूवात करणारी शर्ली हॉलिवूडची पहिली बालकलाकार होती. शर्ली फक्त ६ वर्ष वयाची असताना तिला अकादमी अवॉर्डने गौरविण्यात आले होते.
4 / 11
शर्लीने 19344 ते 1933 पर्यंत हॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. यानंतर वयाच्या 21 व्या वर्षांपर्यंत सुमारे 43 सिनेमांत अभिनय केला.
5 / 11
23 एप्रिल 1928 रोजी जन्मलेल्या शर्ली तिच्या आईबाबांचे तिसरे अपत्य होते. शर्लीची आई लहानपणापासून बॅले डान्सर व्हायचे होते. पण तिची उंची तिच्या या स्वप्नाआड आली. यामुळे तिने मुलगी शर्लीच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
6 / 11
शर्लीने वयाच्या तिस-या वर्षापासून डान्स शिकण्यास सुरुवात केली. डान्स शिकत असताना एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली आणि त्याने शर्लीला आॅडिशनसाठी स्टुडिओत बोलवले.
7 / 11
पावर्टी रो हा शर्लीचा पहिला सिनेमा. 1934 साली आलेल्या ‘ब्राइट आय’ या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. दोन वर्षांतच शर्ली इतकी लोकप्रिय झाली की, तिला अख्खे हॉलिवूड ओळखू लागले होते.
8 / 11
21 व्या वर्षांपर्यंत सिनेमात काम केल्यानंतर शर्लीने अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला आणि 1969 साली राजकीय करिअरला सुरूवात केली.
9 / 11
आपल्या राजकीय कार्यकाळात तिला घाना मध्ये राजदूत आणि विदेश विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
10 / 11
शर्ली टेंपलला 1969 मध्ये संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे प्रतिनिधीत्व म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 1988 साली त्यांना मानद विदेश सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
11 / 11
त्यानंतर त्यांनी जनतेच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. अनेक लोकांची मदत केली.
टॅग्स :डूडलगुगलहॉलिवूड