शिवसेना महिला नेत्याची लेक अभिनय क्षेत्रात छाप पाडणार; ही 'सिटी सुंदरी' आहे तरी कोण?
By प्रविण मरगळे | Updated: March 20, 2025 19:21 IST
1 / 8अलीकडेच झी मराठी या वाहिनीवर चल भावा सिटीत हा शो सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील तरूण आणि शहरी भागातील मुली यांना एकत्रित आणून गावरान शैली आणि शहरी तडका दाखवण्याचा हा शो आहे. 2 / 8अभिनेता श्रेयस तळपदे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या शो मध्ये शहरी भागातील तरूणींचा समावेश आहे. 3 / 8त्यातील एक नाव आहे अक्षता उकिरडे (Akshata Ukirde) ग्रामीण भागातील कबड्डीपटू क्रिश गावडे आणि फुडी अक्षताची टास्कमध्ये जोडी एकत्रित खेळणार आहे. 4 / 8अक्षता ही मूळची पुण्याची आहे. अक्षता उकिरडे हिची आणखी एक ओळख म्हणजे तिची आई कट्टर शिवसैनिक आहे. पुण्यातील शिवसेना महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुनीता उकिरडे यांची ती कन्या आहे. 5 / 8एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सुनीता उकिरडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.6 / 8अक्षताला आधीपासून मॉडेलिंगचा छंद होता, त्याशिवाय ती रिअल इस्टेटमध्येही काम करते. तिने सेल्स आणि मार्केटिंगमध्ये अनुभव घेतला असून ती राजकारणातही बऱ्यापैकी सक्रीय आहे. 7 / 8लोकसभा निवडणुकीत भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारावेळी अक्षताने शिवसेनेकडून सहभाग घेतला होता.8 / 8चल भावा सिटीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षता उकिरडे चर्चेत आली आहे. अक्षताचं स्वत:वर खूप प्रेम असून ती कधी काय करेल याचा नेम नाही, तिला खायला खूप आवडत असून भटकंती करण्यासाठी ती कधीही तयार असते अशी तिची ओळख सांगण्यात आली. गावातील मुलांसोबत तिला शोमध्ये टास्क खेळावे लागणार आहेत.