IN PICS : शिवानी रांगोळे सासूबाईंना ‘आई’ नाही ‘मृणाल ताई’ म्हणते, काय आहे कारण? By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 11:13 AM1 / 13मराठमोळी अभिनेत्री शिवानी रांगोळे ( Shivani Rangole ) ही आता कुलकर्ण्यांची सून आहे. 2 / 13 मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी यांनी गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली.3 / 13शिवानी व तिच्या सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यात खास बॉन्ड आहे. शिवानी ही सासूबाईची अत्यंत लाडकी आहे.4 / 13होय, दोघीही सासू सूना कमी अन् मैत्रिणी अधिक आहे. म्हणूनच आजही शिवानी सासूबाईंना एकेरी बोलवते. ‘ताई’ अशी हाक मारते.5 / 13लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत शिवानीने यामागचं कारण सांगितलं होतं. एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली.6 / 13विराजसची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यांना अगोदरपासूनच आपली होणारी सून कोण आहे? हे माहिती होते. कारण शिवानी आणि विराजस कॉलेजपासून एकत्र होते.7 / 13 शिवानी व विराजस सतत एकमेकांबरोबर राहत असल्याने लोकांनी आधीच त्यांनी कपल म्हणून हाक मारण्यास सुरुवात केली होती.8 / 13विराजस शिवानीला घेऊन कायम घरी यायचा. हा दरवेळी शिवानीलाच घरी का आणतो, असा प्रश्न त्यावेळी मृणाल कुलकर्णींना पडलेला असायचा. 9 / 13शिवानी व मृणाल यांची त्यामुळे चांगलीच ओळख होती. दोघींनी एकत्र काम केल्यामुळे सेटवर शिवानी मृणाल यांना ताई म्हणायची. 10 / 13पण विराजसची लग्न झाल्यावर मृणाल शिवानीच्या सासूबाई होणार होत्या. त्यामुळे आता त्यांना काय हाक मारू, असा प्रश्न शिवानीला पडला होता.11 / 13अखेर सासूबाईंनीच शिवानीच्या मनातला गुंता सोडवला. तू मला ताईच म्हण, मला आवडेल..., असं मृणाल यांनी आपल्या लाडक्या सूनेला स्पष्टच सांगितलं. 12 / 13यामुळेच आजही शिवानी मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते. हे ऐकल्यावर अनेकांना वेगळ वाटतं, पण सासू सूना मात्र आपल्यातच गुंग असतात.13 / 13शिवानी रांगोळे ही लवकरच एका नव्या मालिकेत झळकणार आहे.तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत शिवानी काम करतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications