फक्त पाच वर्षच टिकले दीया मिर्झाचे पहिले लग्न, या कारणामुळे झाला होता घटस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 03:17 PM 2021-02-15T15:17:15+5:30 2021-02-15T15:32:11+5:30
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये दीया मिर्झाचेही नाव गणले जाते.
दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा बॉयफ्रेड साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलसोबत तिने 2019 मध्ये घटस्फोट घेत वेगळी झाली.
दीया आणि साहिल दोघांच्या घटस्फोटाने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आमच्यात मैत्रीचं नातं असेल. आमच्या या निर्णयाचा सगळ्यांनी आदर करावा.' असं दिया म्हणाली होती.
११ वर्षापासून दोघेही एकमेकांसोबत होते. लग्नाआधी दोघांची चांगली मैत्री होती. अखेर परस्परांच्या संमतीने आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे दीया मिर्झाने म्हटले होते.
घटस्फोट घेतल्यानंतर दीया मिर्झाच्या आयुष्यात खूप बदलही आला होता. घटस्फोटीत महिलेकडे पाहण्याची लोकांची नजर आजही बदलेली नसल्याचे दीयाने सांगितले होते.
घटस्फोटीत महिला हा ठपका तुमच्यावर बसतो. तसेच तुम्हाला तडजोड करायची नसल्याने तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असतो असे देखील काहींना वाटते.
तुमच्या आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागते ही गोष्ट मी देखील मान्य करते. पण त्याला पण काही मर्यादा असल्या पाहिजेत असे दीयाने सांगितले होते.
दीया तिचा भूतकाळ विसरुन पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडण्यासाठी सज्ज झाली आहे.
लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.
वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो.
वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे.