Join us

फक्त पाच वर्षच टिकले दीया मिर्झाचे पहिले लग्न, या कारणामुळे झाला होता घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 3:17 PM

1 / 12
काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये दीया मिर्झाचेही नाव गणले जाते.
2 / 12
दीया मिर्झाने ऑक्टोबर 2014 मध्ये तिचा बॉयफ्रेड साहिल सिंघाशी लग्न केले होते. मात्र या दोघांचे लग्न फार काळा काही टिकले नाही. साहिलसोबत तिने 2019 मध्ये घटस्फोट घेत वेगळी झाली.
3 / 12
दीया आणि साहिल दोघांच्या घटस्फोटाने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
4 / 12
आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आमच्यात मैत्रीचं नातं असेल. आमच्या या निर्णयाचा सगळ्यांनी आदर करावा.' असं दिया म्हणाली होती.
5 / 12
११ वर्षापासून दोघेही एकमेकांसोबत होते. लग्नाआधी दोघांची चांगली मैत्री होती. अखेर परस्परांच्या संमतीने आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याचे दीया मिर्झाने म्हटले होते.
6 / 12
घटस्फोट घेतल्यानंतर दीया मिर्झाच्या आयुष्यात खूप बदलही आला होता. घटस्फोटीत महिलेकडे पाहण्याची लोकांची नजर आजही बदलेली नसल्याचे दीयाने सांगितले होते.
7 / 12
घटस्फोटीत महिला हा ठपका तुमच्यावर बसतो. तसेच तुम्हाला तडजोड करायची नसल्याने तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असतो असे देखील काहींना वाटते.
8 / 12
तुमच्या आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागते ही गोष्ट मी देखील मान्य करते. पण त्याला पण काही मर्यादा असल्या पाहिजेत असे दीयाने सांगितले होते.
9 / 12
दीया तिचा भूतकाळ विसरुन पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडण्यासाठी सज्ज झाली आहे.
10 / 12
लॉकडाऊनच्या दरम्यान दीया आणि वैभव एकमेकांच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. ते अनेक महिन्यांपासून एकमेकांसोबत नात्यात असून ते इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.
11 / 12
वैभव रेखी हा प्रसिद्ध व्यवसायिक मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध समजल्या जाणा-या पाली हिल परिसरात राहातो.
12 / 12
वैभवचे देखील हे पहिले लग्न नाहीये. त्याचे पहिले लग्न योगा आणि लाईफस्टाईल कोच सुनैना रेखीसोबत झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे.
टॅग्स :दीया मिर्झा