Stree 2 : चंदेरी नगरीत धडकी भरवणारा 'सरकटा' आहे तरी कोण? 'द ग्रेट खली'पेक्षाही जास्त उंची! By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 4:55 PM1 / 10Who Is The Real Sarkata In Stree 2 : अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला 'स्त्री 2' (Stree 2) हा बहुप्रतिक्षित चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतेय. 2 / 10बॉक्स ऑफिसवर 'स्त्री- 2'ची घौडदौड जोरात सुरू आहे. 'स्त्री २' हा या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरतोय. 3 / 10 'स्त्री 2' सिनेमाचा विषय आणि वेगळं कथानक या गोष्टींमुळे 'स्त्री २' प्रेक्षकांचा आवडीचा सिनेमा बनला आहे. 'स्त्री 2'मध्ये एकापेक्षा एक कलाकार पाहायला मिळत आहेत. 4 / 10राजकुमार राव, श्रद्धा कपूर या कलाकारांची प्रमुख भूमिका आहेच. शिवाय अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी या कलाकारांनी 'स्त्री 2'ला चार चाँद लावले आहेत.5 / 10सध्या एका आणखी पात्राची चर्चा होताना दिसतेय. 'स्त्री 2'मध्ये दिग्दर्शक अमर कौशिकने भयानक दैत्याकार दानवाची एन्ट्री केली आहे. तो म्हणजे 'सरकटा' (Sarkata). 6 / 10चंदेरी गावात स्त्रीनंतर आता 'सरकटा' भूताची दहशत आहे. त्याची दहशत आणि त्या भीतीतून निर्माण होणारी कॉमेडी हा मनोरंजनाचा जबरदस्त डोस पडद्यावर पाहायला मिळतोय. हा 'सरकटा' चंदेरीमधील मॉडर्न विचारांच्या मुलीला उचलून घेऊन जातो. 7 / 10चंदेरी नगरीत धडकी भरवणारा 'सरकटा' आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर चित्रपटात 'सरकटा'ची भूमिका साकारणाऱ्या पडद्यामागच्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.8 / 10'सरकटा' ही भुमिका साकारणाऱ्या व्यक्तीचं नाव सुनील कुमार (Sunil Kumar in Stree 2 as Sarkata) असे आहे. सुनील कुमार हा मुळचा जम्मूचा (Jammu) आहे. त्याची उंची ही 'द ग्रेट खली'पेक्षाही जास्त आहे. 'द ग्रेट खली'ची उंची ही 7 फूट 3 इंच इतकी आहे. तर सुनील कुमारची उंची ही 7 फूट 7 इंच इतकी आहे. म्हणून त्याला 'जम्मूचा द ग्रेट खली' (Great Khali of Jammu) असेही म्हटलं जातं. 9 / 10सुनील कुमारची ओळख प्रोफेशनल रेसलर अशी आहे. त्याला 'द ग्रेट अंगार' या नावानेही ओळखले जाते. तो हँडबॉल आणि व्हॉलीबॉलचा खेळाडू देखील आहे. 10 / 10'सरकटा' भूमिकेसाठी सुनीलची निवडीबद्दल दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) म्हणाले, 'कास्टिंग टीमने त्याची निवड केली. आम्हाला खूप उंची असलेला माणूस हवा होता. त्यासाठी सुनील हा परफेक्ट ठरला. आम्ही त्याच्या बॉडीचे शॉट्स घेतले आणि चित्रपटात दिसणारा त्याचा चेहरा हा CGI तंत्रज्ञानापासून बनवण्यात आला'. आणखी वाचा Subscribe to Notifications