"मध्यरात्री उठून तो श्वास घेतोय का हे पाहते", श्रेयसच्या Heart Attack बद्दल बोलताना पत्नी भावुक By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 3:56 PM1 / 8अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मराठीबरोबरच बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. कोणतंही व्यसन नसलेल्या आणि एकदम फिट असलेल्या श्रेयसला काही दिवसांपूर्वीच अचानक हृदयविकाराचा झटका आला. 2 / 8हृदयविकाराचा झटका आलेल्या श्रेयसला त्याची पत्नी दीप्तीने मृत्यूच्या दारातून परत आणलं. श्रेयसवर अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती. त्यानंतर आता तो कामावर परतला आहे. 3 / 8श्रेयस आणि दीप्तीने नुकतीच 'मित्र म्हणे' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्या कठीण प्रसंगाबद्दल भाष्य केलं. 4 / 8दीप्ती भावुक होत म्हणाली, 'मी अजूनही मध्यरात्री उठून बसते आणि श्रेयसकडे बघत राहते. तो श्वास घेतोय का? हे मी पाहत असते. त्याची छाती आणि पोट हलतंय का हे मी पाहते.'5 / 8'जेव्हा मला खात्री होते की तो श्वास घेतोय तेव्हा मी परत झोपते. हॉस्पिटलमधून तो घरी आल्यानंतरही मी त्याच्याकडे नुसतंच बघत बसायचे.'6 / 8'माझ्या डोक्यात कोणतेच विचार नसायचे. पण, मी फक्त बघत राहायचे. तो आहे, फक्त ही खात्री मला हवी असायची.'7 / 8'तो बसलेला असतानाही मी त्याला हात लावून बघायचे. मी आताही असं करते.'8 / 8श्रेयस आणि दीप्तीने २००४ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगीही आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications