कमल हासनची लेक श्रुती हासन पुन्हा पडली प्रेमात? या आर्टिस्टसोबत सुरु झाल्या डेटींगच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 08:00 AM2021-01-30T08:00:00+5:302021-01-30T08:00:02+5:30

मध्यंतरी श्रुती हासन विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.

सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन हिचा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा झाला आणि या वाढदिवसासोबतच तिच्या डेटींगचीही चर्चा सुरु झाली.

होय, बॉलिवूड, टॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने घायाळ करणारी श्रुती नव्याने प्रेमात पडल्याचे मानले जातेय.

श्रुतीने वाढदिवसाचे काही फोटो शेअर केलेत आणि पाठोपाठ ती शांतनु हजारिकाला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली.

या फोटोत श्रुती शांतनुसोबत बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसतेय. शांतनुनेही श्रुतीच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.

आता हा शांतनु हजारिका कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो एक डुडल आर्टिस्ट आहे.GAP अर्थात गौहाटी आर्ट प्रोजेक्टचा सहसंस्थापक आहे.

इलस्ट्रेटर बनण्यासाठी शांतनुने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले होते.

गेल्या 27 जानेवारीला म्हणजे वाढदिवसाच्या एक दिवस आधी श्रुती व शांतनु एअरपोर्टवर एकमेकांना मिठी मारताना दिसले होते.

तसे खासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती अनेकदा चर्र्चेत असते. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिलेत. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले.

तसे खासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती अनेकदा चर्चेत असते. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिलेत.. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले.

यानंतर साऊथ अ‍ॅॅक्टर धनुषसोबत आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अर्थात या चर्चा अफवा ठरल्या.

मध्यंतरी विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले.