कमल हासनची लेक श्रुती हासन पुन्हा पडली प्रेमात? या आर्टिस्टसोबत सुरु झाल्या डेटींगच्या चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 8:00 AM1 / 11सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन हिचा वाढदिवस नुकताच धुमधडाक्यात साजरा झाला आणि या वाढदिवसासोबतच तिच्या डेटींगचीही चर्चा सुरु झाली.2 / 11होय, बॉलिवूड, टॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने घायाळ करणारी श्रुती नव्याने प्रेमात पडल्याचे मानले जातेय.3 / 11श्रुतीने वाढदिवसाचे काही फोटो शेअर केलेत आणि पाठोपाठ ती शांतनु हजारिकाला डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली.4 / 11या फोटोत श्रुती शांतनुसोबत बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसतेय. शांतनुनेही श्रुतीच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत.5 / 11आता हा शांतनु हजारिका कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो एक डुडल आर्टिस्ट आहे.GAP अर्थात गौहाटी आर्ट प्रोजेक्टचा सहसंस्थापक आहे.6 / 11इलस्ट्रेटर बनण्यासाठी शांतनुने त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले होते. 7 / 11गेल्या 27 जानेवारीला म्हणजे वाढदिवसाच्या एक दिवस आधी श्रुती व शांतनु एअरपोर्टवर एकमेकांना मिठी मारताना दिसले होते.8 / 11तसे खासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती अनेकदा चर्र्चेत असते. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिलेत. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. 9 / 11तसे खासगी आयुष्यातील अफेअरमुळे श्रुती अनेकदा चर्चेत असते. सर्वप्रथम साऊथ स्टार सिद्धार्थसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. हे दोघे काही काळ लिव्ह-इनमध्येही राहिलेत.. पण कालांतराने दोघांचे ब्रेकअप झाले. 10 / 11यानंतर साऊथ अॅॅक्टर धनुषसोबत आणि क्रिकेटर सुरेश रैनासोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अर्थात या चर्चा अफवा ठरल्या. 11 / 11मध्यंतरी विदेशी अभिनेता मायकल कोर्सेलसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लग्न करणार अशाही बातम्या होत्या. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications