Join us

प्रेमात कमनशिबी ठरल्या या अभिनेत्री, एकदा नाही तर दोनदा झालाय घटस्फोटाचं, आज जगतायेत असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 3:36 PM

1 / 10
या लिस्टमधलं पहिलं नाव आहे टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे. श्वेता तिवारीने अगदी लहान वयात राजा चौधरीशी लग्न केले. राजा आणि श्वेता यांना एक मुलगीही आहे. मात्र, काही काळानंतर नात्यात कटुता आल्याने तिने राजा चौधरीला घटस्फोट दिला.
2 / 10
राजा चौधरीला घटस्फोट दिल्यानंतर श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहलीची एंट्री झाली. पण हेही नातं एका वाईट वळणावर येऊन संपलं.
3 / 10
चाहत खन्नाचं पहिल्यांदा उद्योगपती भरत नरसिंघम यांच्या प्रेमात पडली. २००६मघ्ये दोघांनी लग्नदेखील केलं. मात्र काही वर्षांनी अभिनेत्रीचा पहिला संसार मोडला.
4 / 10
चाहतनं दुसरं लग्न फरहान मिर्झासोबत करुन प्रेमाला पुन्हा एकदा संधी देण्याचा प्रयत्न केला. पण हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.
5 / 10
अनेक दशके टीव्हीवर राज्य करणारी अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिचे वैयक्तिक आयुष्यतही अनेक चढ-उतार आहे. तिनं पहिलं लग्न 1997 मध्ये जीत उपेंद्रसोबत केले होते. या लग्नापासून अभिनेत्रीला दोन मुलं आहेत.
6 / 10
पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने २०१२ मध्ये केशव अरोरासोबत दुसरं संसार थाटला, पण काही वर्षांतच हे लग्नही मोडले.
7 / 10
स्नेहा वाघ खूप कमी वयाची असताना म्हणजे १९ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली होती. अविष्कार दार्वेकरसह तिने लग्न केले. मात्र ती कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडली.
8 / 10
यानंतर तिने २०१५ साली अनुराग सोळंकी सोबत दुसरे लग्न केले. अनराग इंटिरियर डिझायनर आहे. मात्र हे लग्नही केवळ आठ महिनेच टिकले.
9 / 10
सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबतच्या नात्यामुळे टीव्ही अभिनेत्री चारू असोपा खूप चर्चेत आली. या जोडप्यामधील प्रेम आणि भांडणं बराच काळ सुरू होती. पण आता हे कपल वेगळे झाले आहे.
10 / 10
राजीव सेनसोबत चारूचं दुसरं लग्न होतं. मात्र लग्नाच्या काहीवर्षांत दोघांच्या नात्यात दुरावा आला. आज चारु सिंगल मदर म्हणून मुलीचा संभाळ करतेय.
टॅग्स :श्वेता तिवारीटिव्ही कलाकारघटस्फोटस्रेहा वाघ