Join us

PHOTOS : आपला सिध्दू ! सिद्धार्थ जाधवचा हटके लुक; चाहत्यांना आठवला रणवीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 4:59 PM

1 / 10
आपला सिध्दू अर्थात अभिनेता आणि कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव. कॉमेडीच नाही तर आपल्या अभिनय कौशल्याने सिद्धार्थने रसिकांची मनं जिंकली आहे. त्याच्या हटके स्टाईलवरही चाहते फिदा आहेत.
2 / 10
तूर्तास त्याच्या हटके फोटोंची जोरदार चर्चा रंगलीये. खुद्द सिद्धार्थने काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 10
सिद्धार्थ जाधव बºयाचदा अतरंगी स्टाईलमध्ये दिसतो. या फोटोतही त्याचा असाच लूक दिसतोय.
4 / 10
चाहत्यांनी त्याच्या या फोटोंवर एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी त्याला महाराष्ट्राचा रणवीर सिंग म्हटले आहे.
5 / 10
रणवीर बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटिक अ‍ॅक्टर म्हणून ओळखला जातो. तर सिद्धार्थ हा मराठी चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक एनर्जेटिक अभिनेता मानला जातो.
6 / 10
मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मधून प्रेक्षकांना हसविणा-या सिद्धार्थने प्रियतमा या चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाची ओळख देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
7 / 10
दे धक्का या चित्रपटातील भूमिकेसाठी सिद्धूला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 2008 सालच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारावरही त्याने आपले नाव कोरले.
8 / 10
सिद्धार्थने रुपेरी पडदा, रंगभूमी आणि छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
9 / 10
सिद्धार्थने केवळ मराठीच नाही तर हिंदीतही अजय देवगण, रणवीर सिंगसारख्या बड्या स्टार्ससोबत रुपेरी पडदा गाजवला आहे.
10 / 10
अलीकडे सलमान खानच्या राधे: युअर मोस्ट वॉण्टेड भाईमध्ये सिद्धार्थ जाधव झळकला होता.
टॅग्स :सिद्धार्थ जाधवरणवीर सिंग